पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३४ ) झाला, परंतु तो चांगला सफल झाला नाही. पुढे चहाचे झाडाची एक जात आसामांत सांपडली तिची लागवड करून सुधारणा केल्यापासून चहाचे गुणांत चांगली सुधारणा झाली आहे. सन १८९१-९२ सालों १२३७ लक्ष पौंड चहा उत्पन्न झाला होता. सिंकोनाची लागवड या देशांत सन १८६१ पासून सुरू झाली. पाहिल्याने अनुभव पाहण्यासाठी ती झाडें नीलगिरीवर लावण्यात आली. आतां सिक्किम, नीलगिरी, दार्जलिंग, सालेम, कुर्ग व झैसूर प्रांतांत लागवड होते. सन १८९१--९२ साली सरकारी व खासगी मिळून १४८ लक्ष झाडे होती व त्यांपासून १९ लक्ष पौंड साल निघाली होती. उंस--उसाची लागवड सन १८८४-८५ पासून दुप्पट वाढली जाहे. बंगाल व वायव्यप्रांताचा याचे लागवडीसंबंधाने पहिला नंबर आहे ; त्याचे खालोखाल पंजाब व अयोध्याप्रांतांचा नंबर येईल. दक्षिण व मध्याहंदुस्थानांत उसाची लाग- वड फारशी नाही तरी ती वाढत आहे. या देशांतील ऊंस मारिशस येथील उंसाइतका चांगला नसतो. नीळ-हें पीक विशेषतः बंगाल, वायव्यप्रांत व मद्रास या प्रांतांत होते. बंगा- ल्यांत निळीची लागवड युरोपिअन लोकांनी चालू केली व ती विशेषतः त्यांचेच हाती आहे. उत्तरबिहार व मद्रासेकडे एतद्देशीय लोक तिची लागवड करतात. सन १८८० चे मानाने पाहतां निळीची किंमत पुष्कळशी उतरली आहे. येथपर्यंत लागवडीस असलेली व लागवडीलायक पड जमीन किती आहे व कोणती पिकें किती जमिनीत होतात वगैरे गोष्टीबद्दल माहिती सांगितली. आतां धान्यांचे किमतीसंबंधाने सांगण्याचे आहे. सन १८६० सालापर्यंत धान्याच्या किमती उतरत जात होत्या व त्यांच्यांत फेरबदलही फार होत असत. त्या सालानंतर त्या स्थिर रहात गेल्या आहेत; व त्यांचा कल साधारण वाढण्याक- डेच आहे. याचे कारण असे आहे की, रस्ते सुधारल्याने एका ठिकाणचे पीक दुसरे ठिकाणी जाऊ लागले व परदेशास जाणारे मालांतही पुष्कळ वृद्धि झाली आहे, त्यामुळे राहिलेले मालास चांगला दर येतो. पूर्वी मौल्यवान धातूचे नाणेही हल्लीइतके नव्हतें व व्यापारही हल्लीसारखा नव्हता. नाणे कमी असले झणजे किमती उतरतात व ते पुष्कळ झाले ह्मणजे त्या चढतात, असा अर्थशास्त्राचा नियम आहे व या नियमाप्रमाणेच नाण्याचे विपुलतेचे मानाने धान्यांचे दरांत फेरवदल झाला आहे. सन १८६४-६५ सालापासून अगगाड्या वगैरे कामांसाठी परदेशांतून या देशांत पैसा फार आला व त्या वेळेपासून धान्यांचे दरांतही चढ झालो. रस्ते व आगगाड्या झाल्याने धान्यांच्या किमती सर्वत्र सारख्या