पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुइमूग होतात. (२३३ ) जास्त होते. उत्तरहिंदुस्थानांत मोहोरी, घोडेराई वगैरे व दक्षिणहिंदुस्थानांत कापूस व जूट-कापूस फार प्राचीन काळापासून सर्व हिंदुस्थाभर होतो. सन १८६१-६५ पर्यंत अमेरिकेतील लढाईचे कारणाने तिकडील कापूस विलाय- तेस जाईनासा झाला होता, त्या वेळी या देशांतील कापसास तेजी आली होती. त्याच वेळेपासून त्याचे लागवडीसही उत्तेजन आले. परदेशांतील चांगल्या जातीचे कापसाची लागवड इकडे करण्याचे प्रयत्न तेव्हांपासून पुष्कळ वेळा झाले आहेत, व त्यांपासून पिकांत काही सुधारणाही झाली आहे; तरी तिकडील पिकाचे चांगले गुण इकडे काही दिवसांनी कमी होत जातात. इकडे ज्या लांब धाग्याच्या कापसाच्या जाती आहेत त्याच सुधारण्याचा प्रयत्न झाला असता तर कापसाचे जातीत चांगली सुधारणा झाली असती असा डा. वाटसाहेबांचा अभिप्राय आहे. व-हाड व सिंध शिवायकरून मुंबईइलाख्याचे उत्तर व दक्षिण भागांत उत्तम कापूस होतो. मुंबईइलाख्याचा मध्यभाग, मद्रास, वायव्यप्रांत, वरचा ब्रह्मदेश यांत पुष्कळ कापूस होतो, परंतु त्याची तार लहान असते. इंग्रजी मुलखाचे बाहेर संस्थानांत ९० लक्ष एकर जमिनीत कापसाची लागवड होते असा अंदाज आहे. कापूस परदेशांस फार जातो, त्याबद्दल माहिती व्या- पाराचे सदरांत सांगण्यात येईल. या देशांतील गिरण्यांतही कापसाचा पुष्कळ खप होतो. जूट (ताग) बंगाल्याचे उत्तर व पूर्व भागांत व आसामचे दक्षिण भागांत होतो. तंबाखू-हिची लागवडही सर्व देशांत होते ; ती बहुतेक देशांतील खपासा- ठौंच होते. काही ठिकाणी परदेशांत पाठविण्यासाठी लागवड होते, त्यांत डिडि- गूळ येथील तंबाखू प्रसिद्ध आहे. परदेशांतील तंबाखूच्या चांगल्या जाती इकडे लोगवडीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. काफी-बुंद-हा पदार्थ मळ या देशांतील नाही. तो अरबांनी या देशांत आणला व त्याची लागवड पहिल्याने मलबारचे किनाऱ्यावर झाली. हल्ली काफी- ची लागवड नीलगिरी पर्वत, वैनाद व सालेम (मद्रास इलाख्यांत), आसाम प्रांत, कोचीन, लावणकोरसंस्थान व मैसूर संस्थानच्या पश्चिमभागांत होते. एकंदर सर्व प्रांतांत मिळून सन १८९१-९२ साली चार लक्ष वीस हजार एकर जमि- नीत हे पीक करण्यांत आले. चहा--चहाची लागवड या देशांत सन १८३५ सालापासून सुरू झाली. प्रथ- मतः चिनांतून चहाचे बियाणे आणून इकडे चहाची लागवड करण्याचा प्रयत्न