पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३२) बंगाल्यासंबंधाने आंकडे अजमासाचे आहेत, कारण त्या प्रांतांत माहिती मिळविण्याचेसंबंधाने नीटशी व्यवस्था लागलेली नाही. या देशांत होत असलेले काही महत्वाचे पिकांसंबंधाने साधारण थोडी मा- हिती देतों. तांदूळ हे पीक कमी जास्ती सर्व प्रांतांत होते. ज्या प्रांतांत हे पीक जास्त होतें तेथील कनिष्ठ व मध्यम वर्गाचे लोकहीं तेंच धान्य खातात; परंतु तें धान्य कमी होते असे भागांत वरिष्ठ दर्जाचे लोक मान तें खातात. एकंदरीत एक- तृतीयांश लोक तांदूळ खातात असे दिसून आले आहे. १८७८ चे आंकड्यांशी ताडून पाहता, सर्व प्रांतांत या पिकाची लागवड वाढली आहे. ह्या धान्याचा खप ह्या देशांतच होतो असें नाहीं; तें परदेशांतही पुष्कळ जातें; ह्याबद्दल मा- हिती व्यापाराचे भागांत येईल. गहूं- या पिकाची लागवड गेले वीस वर्षांत पुष्कळ वाढली आहे. हे धान्य परदेशांस फार जातें हे त्या वाढीचे कारण आहे. हे धान्य खाण्याचा उत्तर- हिंदुस्थानांत विशेष परिपाठ आहे, व त्याची लागवडही त्याच भागांत जास्त होते. गव्हांत प्रकार पुष्कळ आहेत, तरी त्यांचे एकंदर चार वर्ग करता येतील- पांढरे, तांबडे, टणक व मऊ. टणक, पांढरे व तांबडे गव्हांचा हिंदुस्थानांत खप चांगला होतो; त्यांचे मानानें मऊ तांबडे गव्हांस किंमत कांहीं कमी येते. गव्हाची लागवड जास्त झाल्याने दुसरे नित्य खाण्याचे धान्याची लागवड कमी झाली असें नाही. ज्वारी व वाजरी-गव्हांचेइतकीच जमीन ज्वारीचे पिकाखाली आहे; बा- जरीखाली त्याचे निम्याने आहे. मुंबई व मद्रासप्रांतांत ज्वारी व बाजरी ही दोन्ही धान्ये विशेष पिकतात. वन्हाडांत ज्वारी विशेष पिकते व पंजाबांत बाजरी जास्त होते. डानीची धान्यें--या धान्यांत प्रकार फार आहेत. हिंदुस्थानसरकाराकडून जे पिकांबद्दल पुस्तक छापून निघतें त्यांत हरभऱ्याबद्दलच तपशील दाखविलेला असतो. हरभरे उत्तर वै मध्य हिंदुस्थानांत व पश्चिमहिंदुस्थानांत होतात. दक्षिणेकडे कुळथी विशेष पिकते. एकंदरीत डाळदाण्याचे पीक पंजाब, वायव्य, व अयोध्या प्रांतांत जास्त होते. या पिकाची लागवड स्वतंत्र किंवा दुसरे धा- न्यांबरोबर करतात. गळिताची धान्ये-जवस मध्यप्रांत, व-हाड, वायव्य व अयोध्या या प्रांतांत विशेष होतो. तिळी मध्यप्रांतापासून खालचे भागांत जास्त होते. मद्रासेकडे एरड्या लावण्याची जास्त वहिवाट आहे. मुंबई इलाख्यांत खुरासणी व करडी