पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२५) या व सरकारास शेतकीचे स्थितीची माहिती सर्व प्रांतांची एकवट करून देत जावी; तसेंच त्याने दुष्काळाची चिन्हें दिसतांच सरकारास बातमी द्यावी व त्याचे निवारणासाठों काय उपाय योजावे याबद्दल अंदाज तयार करून द्यावा ; शेतकी- चे खात्यावर हिंदुस्थानसरकारचे हाताखाली एक अंमलदार असावा, वगैरे. सूचनांप्रमाणे हल्ली सर्व प्रांतांत तजवीज झाली आहे. या पूर्व उपाया संबंधाने सूचना झाल्या. दुष्काळ पडल्यावर कशी तजवीज करावी याबद्दलही या कमिशनानें सूचना केल्या होत्या व त्यांस अनुसरून एक "फ्यामीन कोड" (दुष्काळाचेसंबंधाने नियमसंग्रह) करण्यांत आला आहे. शेतकी खात्याचे अंमलदारांनी दुष्काळाची चिन्हें दिसल्याचे सरकारास कळवितांच या नियमाप्रमाणे अंमल सुरू होतो व दुष्काळाचे व्यवस्थेचे काम जिल्ह्याचे मुख्य अंमलदाराचे हाती जाते. दुष्काळपीडितांस मदत देण्याची ती दोन त-हेनें देण्यांत येते; एक रस्ते, तलाव वगैरे कामें सुरू करून त्यांवर लोकांस मजुरीने लावून व मुफत अन्न देउन; दुष्काळपीडित प्रांताचे विभाग करून त्या विभाग- वार अन्नछत्रे, दवाखाने वगैरे स्थापन करण्यांत येतात. आतां धान्य आणवि- ण्यासंबंधाने सरकारास तजवीज करण्याचें आगगाड्या वगैरे झाल्याने कारण राहिले नाहीं; व्यापाराचे क्रमानेच एखादे भागांत महागाई होतांच चांगले संपन्न भागांतून माल येऊ लागतो व चढलेल्या किमती उतरतात. गुरांसाठी राखून ठेवलेले जंगलांत चारण्याची मुफत सोय करण्यांत येते व सारा घेण्याचें तहकूब करण्यांत येते किंवा प्रसंगी तो माफ करण्यांत येतो. अलीकडे मदत देण्याची एक नवीन रीत सुरू करण्यांत आली आहे ती अशी की, जमिनीचे मालकांस ती सुधारण्यासाठी तिचे तारणावर रकम कर्जाऊ देण्यांत येते ; ते लोक मजुरदार लाऊन तें काम सुरू करतात, तेव्हां अर्थातच दुष्काळ- पीडितांस मदत होऊन शेतकीचीही सुधारणा होते. हे कर्ज दुष्काळांत च मिळतें असें नाही. सर्व काळी मिळतें.. जमिनी सुधारण्यासाठी मदत सन १८८१-८२ साली रु. ४८०४८०० व सन १८९१-९२ साली रु. २०६३८०० देण्यांत आली होती. दुष्काळपीडितांस मदत देण्यासाठी पैशाची तजवीज कशी करण्यांत येते व त्या पैशापैकी सालोसाल कसा खर्च करण्यांत येतो याब- इल जमाखर्चाचे भागांत सांगितलेच आहे. गेले शंभर वर्षांत दुष्काळ पडले त्यांबद्दल साधारण माहिती मिळते ती मोडक्यांत देतो:- १७६९-७०-बंगाल्यांत-सुमार एकतृतीयांश लोक मयत झाले.