पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.७१ १० १९१ ४९८ २० १०७८ वरचा ब्रह्मदेश. ४८६ खालचा ब्रह्मदेश. ४९४ आसाम (६ जिल्ह्यां- पुर्ती माहिती). ५ वन्हाड. ९७३ कुर्ग. -३० अजमीर. १६४ ३७१ ३ बेरीज सर्व हिंदुस्थानची. २७५२४ ३०६६२ १०९५

  • यांत इतर कांहीं प्रांतांबद्दल आंकडे आहेत.
  • याशिवाय वासरें व रेडके १५३१० आहेत.
    • या प्रांताचे बैल व टोणगे यांचे आंकड्यांत गाई-मशी यांबद्दल आंकडे

सामील आहेत. दुष्काळासंबंधाने व्यवस्था-या देशांत आजपर्यंत पुष्कळ दुष्काळ पडले आहेत व मागील अनुभवावरून पहातां पुढे ही त्या बाबतीत भिती नाही असें नाही. सन १८७६ चा दुष्काळ पडल्यावर त्यांचे संबंधानें पद्धतवार व्यवस्था लावण्याची अवश्यकता दिसून आली, तेव्हां दुष्काळाचे वावतींत व्यवस्था कशी असावी याबद्दल माहिती मिळविण्यासाठी एक कमिशन नेमण्यांत आले होते. या कमिशनाने मिळविलेली माहिती अत्यंत महत्वाची आहे व या कमि- शनाचेच सूचनेवरून शेतकीखातें जें मध्यंतरी लयास गेले होते त्याचा उद्धार झाला आहे. या कमिशनाने या खात्याचे मार्फत दुष्काळ निवारणार्थ पूर्वो- पायाची तजवीज कशी करावी हे सांगितले आहे. त्या सूचना अशा आहेत:- प्रत्येक जिल्ह्यांत एका अमलदाराकडून शेतकीचे पिकाबद्दले व धान्याचे दरा- बद्दल माहिती मिळवीत जावी, व त्यावरून त्या सालचे पीक नेहमीप्रमाणे आहे किंवा नाही हे पहावे; असे प्रकाराने सालोसाल माहिती मिळवीत गेल्याने शेत- करी लोकांचे स्थिति संबंधाने अनुमान करण्यास चांगले साधन होईल, व दुष्काळ पडलाच तर कोणते वर्गाचे लोकांस जास्त मदतीची जरूर लागेल हे ही समजेल. या अमलदाराने धान्याचा संग्रह, व्यापाराची स्थिति, कर्ज काय व्याजाने मिळते व मजुरीचा दर काय असतो, मजूर पुरेसे मिळतात किंवा नाही, याबद्दल व याविषयाचे संबंधाचे दुसरे वावतींची माहिती मिळ- वावी ; हा अमलदार कलेक्टराचे हताखाली असावा ; प्रत्येक प्रांतासाठी शेतकीचा एक डायरेक्टर असावा व त्याने नेहमी शेतकीचे सुधारणेचे कामी लक्ष पुरवावे व वर सांगितलेले माहिती मिळविणारे अमलदारावर देखरेख करावी