पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८०-८३-कर्नाटक-मद्राससरकारांनी लोकांत वर्गणी करून मदत केली होती. १७८३-८४-उत्तरहिंदुस्थानांत--ब्रिटिश मुलखाचे बाहेर पडला होता. चांगले साली धान्यसंग्रह करून ठेवण्याचे वारेन हेस्टिग्स् यांनी ठरविलें. १७९०--९२ १८०२-४ मद्रास व दक्षिणहिंदुस्थानांत-यांपैकी पहिले दु- १८०७,१८१२,१८२४ काळापासून दुष्काळपीडित लोकांस सरकारांतून १८३३,१८५४,१८६६ कामें देण्याचे सुरू झाले. १८३८, १८६०-६१--वायव्यप्रांत-यांतील दुसरे दुष्काळापासून सदरप्रमाणे व्यवस्था करण्यांत आली. १८६५-६६-ओरिसा- १८७३-७४--वायव्यप्रांत- यांत सरकारतर्फे कामें सुरू होती व १८७६-७७-७८-दक्षिणहिंदुस्थान-धर्मार्थ खर्च करण्यांत आला होता. शेतकीची स्थिति-ही समजण्यास जमीन लागवडींत किती आहे व लागवडी- लायक किती शिलक आहे ते समजले पाहिजे. त्याबद्दल माहिती खालील कोष्ट- कांत दिली आहे. कायमची धाऱ्याची ठरोती झाली आहे असे प्रांतांत (बंगाल व मद्रासचा काही भाग) ही माहिती उपलब्ध होत नाहीं; या भागांबद्दल मा- हिती अजमासाची आहे. या कोष्टकांत पंजाब व वायव्यप्रांत यांत जमीन लागणीस येण्यासारखी बरीच आहे, परंतु ती पूर्वी लागणीस आलेले जमिनी प्रमाणे चांगले मगदुराची नाही. ब्रह्मदेशांतील जमिनीची मात्र तशी स्थिति नाही. ह्या कमी मगदुराच्या पड जमिनीचा मगदूर खात घालून किंवा बागाईत करून वाढविला पाहिजे. बागाइताचा प्रसार, शेतकी करण्याचे रीतीत सुधारणा, रस्त्यांची वृद्धि व पड जमिनी लागवडीस येणे वगैरे गोष्टी कालेंकरून घडून आल्या ह्मणजे शेतकीचें उत्पन्न हल्लीचेपेक्षां दीडपट वाढणे शक्य आहे. बागाइताचा प्रसार उत्तरहिंदुस्थान व गोदावरी व कृष्णा यांचे मुखांने मधील मद्रास प्रांत व सिंध प्रांत यांतच विशेष आहे. मुंबई इलाख्याचे इतर भागांत मोठे तलाव करून बागाइताची सोय करण्याची खटपट सुरू आहे. मद्रास व अयोध्या प्रांतांत तलावाचे पाण्यानेही शेतकी बरीच होते. सर्व हिंदुस्थानां- तील जमीन घेतली तर सरासरी एकदशांश जमिनीत दोन पिकें होतात. अयोध्या प्रांतांत मात्र शेकडा २४ टक्के जमिनीत व बंगाल व वायव्य प्रांतांत शेकडा १३ व १६ टक्के जमिनीत दोन पिके होतात. मद्रास, सिंघ