पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ वाढीचे प्रमाण शेकडा १५ पासून १७ पर्यंत पडते, १०० ते २०० असेपर्यंत १० पासून १४, ४०० असेपर्यंत काही कमी व त्यापेक्षां दाट वस्तीचे भागांत शेकडा ते ८ असे वाढीचे प्रमाण पडते. साधारण प्रमाण शेकडा ९.७६ पडल्याचें वर सांगितले आहे, ते मैली ३०० पर्यंत वस्ती असेपर्यंत कायम रहातें; त्यावर वस्ती गेली ह्मणजे त्यास उतरतें मान लागते. प्रांतवार विचार पहातां मद्रासेंतील सर्व भागांत साधारण प्रमाण सांगितले आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणाने वाढ होत आहे; मुंबई इलाख्यांत कर्नाटक व दक्षिण भागांत जास्त प्रमाणाने वाढ आहे, त्याचे कारण पूर्वीचे मनुष्यगणतीचे वेळी दुष्काळामुळे त्या प्रांतांतील लोकसंख्या नेहमीपेक्षा कमी झालेली होती हे आहे; खालचे ब्रह्मदेशांत तांदूळ फार पिकतो व शेतकीचीही वाढ फार झालेली आहे त्यामुळे तेथे लोकसंख्येत वाढ जास्त आहे. पंजाब, आसाम व सिंध प्रांत यांतही वाढ जास्त आहे व गेले दहा सालांत पिकाची सुबत्ता चांगली होती. बंगाल्यांतील वेगळाले भागांत हवापाण्याचे स्थितीत फार फरक आहेत व त्याप्र- माणे वेगळाले भागांत वाढीचे प्रमाण निरनिराळे पडले आहे. मध्यप्रांतांत वाढीचें मान साधारण प्रमाणाचे जवळ जवळ आहे ; वायव्य प्रांतांत प्रमाण कमी आहे. या प्रांतांत व बंगाल प्रांतांत ज्या भागांत पाणी मुरून जमीन दल- दलित व खारवट झाली आहे व उत्पन्न कमी येत आहे अशा भागांत वाढ कमी झाली आहे. या प्रांतांतून आसाम, मारिशस वगैरे ठिकाणी मजूर फार जातात. अजमिरांत आगगाडी झाल्याने वाढ झालेली आहे. व-हाडांत वाढ झाली नाही. दुष्काळाचे वेळी उदरनिर्वाहाकरितां आलेले लोक मागील खेपेचे मनुष्यगणतीत सामील झाले ते परत गेल्यामुळे गेल्या गणतीचे वेळी संख्या कमी झाली. तेव्हां वाढ विशेष न होणे हे स्वाभाविक आहे. वेगळाले प्रांतांत साधारण वाढ पुढे लिहिल्याप्रमाणे झाली आहे:- १ मद्रास १५.५८ ८ खालचा ब्रह्मदेश २४.६७ २ वायव्य प्रांत व अयोध्या ६.२३ ९ बंगाल ६.७ ३ वन्हाड १० मध्यप्रांत ४ अजमीर १७.१२ ११ आसाम ११.३० १३७१ १२ कुर्ग २.९४ १८९७ १३ एडन २६.४४ ७ पंजाब ३४.७४ एकंदरीत गेले दहा सालांत पाऊसपाणी फार चांगले होते व त्यामुळे शतकी- ८.४१ ५ मुंबई ६ सिंध