पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२१ ) बद्दल सरकारांत विचार चालू आहे. जंगलासंबंधाने त्यांनी केलेले सुचना संबंधानें मात्र. हिंदुस्थान सरकारांनी ठराव प्रसिद्ध केला आहे ; त्याचा मतलब जंगलाचे भागाचे अखेरीस देण्यात येईल. या शास्त्रवेत्त्यांचा रिपोर्ट फार मोठा व महत्वा- चा व सर्वांनी अवश्य वाचण्यासारखा आहे. त्यांनी केलेल्या सूचनांपैकी दोन तीन वाबतींतील मुख्य सूचना मात्र येथे दाखल करतो. त्यांची एक सूचना अशी- आहे की, शेतकरी वर्गापैकी काही वर्गाचे लोक आस्थेचे व सामर्थ्याचे मानाने इतरापेक्षा जास्त चांगले आहेत व ते नवीन सुधारणा ग्रहण करण्यास जास्त समर्थ असतात; तेव्हां असे लोकांस शास्त्रीय कृषिकर्मविद्येची तत्वें शिकवि- ल्यास फायदा होण्यासारखा आहे व ते ह्मणतात की हे ज्ञान नसलेमुळे हल्ली शे- तकी सुधारण्याचे कामास पुष्कळ हरकत होते. जमीनीचा सुपिकपणा ही प्रमाणे कायम राखण्यास कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल त्यांचे ह्मणणे असें आहे की, जनावरांचे उत्सर्ग, जे भूमीत गेले तर तीस पुष्टिदायक होतील असे, जळण कमी असल्याने, पुष्कळसे खताचे कामी येणारे पदार्थ निरर्थक टा- कले जातात, ते सर्व पदार्थ भूमीस मिळतील असे झाले पाहिजे; या देशांत फेर पाळीने पिकें करण्याची पद्धति चालू आहे ती योग्य तत्वांस अनुसरूनच आहे व त्यांत सुधारणा कशी होईल तें अनुभव घेऊन त्याचे अनुरोधाने ठरविले पाहिजे; चांगले वी मिळवून देण्याचे संबंधाने सरकारांतून तजवीज करावी व सरकारी शेतांत चांगले वियांचा उपयोग लोकांचे प्रत्ययास आणून द्यावा; तसेंच बागाइ- ती पिकें करण्याचे वाढले पाहिजे असे त्यांचे ह्मणणे आहे. त्यांचे दृष्टीस असें पडले की कृत्रिम पाटाचे पाण्यापेक्षां विहिरीचे पाणी जास्त चांगले असें शेत- करी समजतात व शिवाय साधारण समज असा आहे की, विहिरीचे पाणी उ- ष्ण असते व पाटाचे पाणी थंड असते. विहिरीचे पाण्याने शेतकी करतांना ती चांगले काळजीने होते व पाटाचे पाणी असले झणजे तशी होत नाहीं; क- दांचित पाटाचे पाणी मुबलक मिळाल्याने जमिनीत वाजवीपेक्षां फाजिल सोडले जात असेल व फाजिल पाणी मुरल्यापासून होणारे परिणामांमुळे शेतकन्यांचा वर सांगितल्याप्रमाणे समज झाला असेल असे त्यांचे ह्मणणे आहे. हिंदुस्थानसरकारचे शेतकीखाल्याचे चिटणिसांनी बागाइती पिकें किती जास्त होण्यासारखी आहेत याबद्दल अलीकडे शोध केला आहे, त्यांत त्यांस असें दि- सून आले की, ज्या प्रांतांबद्दल माहिती उपलब्ध आहे त्यांत सात कोटी साठ लक्ष एकर जमिनीत बागाइती पिकें होण्यासारखी आहेत; त्यांपैकी सुमारे एक पंचमांश जमिनीत विहिरीचे पाण्याने बागाईत होईल व बाकीचे जमिनीस पा- टाचे पाणी मिळाले पाहिजे. वागाईत वाढविण्याचे संबंधाने सर जेस्स् केअर्ड