पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२२) - यांनी असा अभिप्राय दाखल केला आहे की, लागवडीलायक असलेले जमिनी- पैकी एकतृतीयांश जमिनीत जर बागाइती पिकें होऊ लागली तर जे धान्य जास्त होईल त्यापासून दुष्काळाची भीति नाहीशी होईल; व दरसाल पीक जरी ११ टक्का वाढत जाईल तरी त्यावर वाढत जाणारे लोक संख्येचा गुजारा होईल. शेतकी सुधारण्यासाठी सरकारांतून तगाई मिळते. सरकारांतून पाठ- बंधारे बांधण्यासंबंधाने किती प्रयत्न झालो आहे त्याबद्दल वर्णन पब्लिक वर्क्सचे भागांत येईल. शेतकीची जनावरें-शेतकीस अत्यंत अवश्य जी जनावरें त्यांचेसंबंधानें या देशाची स्थिति कशी आहे ते पाहण्याचे आहे. या देशांत जरूरीपेक्षा पुष्कळ जास्त जनावरे आहेत असा डा. व्होएलकर यांनी अभिप्राय दिला आहे; परंतु दुसरे एका मोठे ग्रंथकाराचे ग्रंथांत या देशांत शेतकीस पुरेसा जनावरांचा संग्रह नाही व ती चान्याचे कमताईमुळे चांगली पुष्ट नसतात असा अभिप्राय दाखल आहे. जनावरांस हवा तितका चारा मिळत नाहीं व ती उत्पन्न करण्यासंबंधाने योग्य काळजी घेण्यांत येत नाही व त्यामुळे ती अशक्त असतात; शेतांत चाऱ्यासाठी पिके लावणे व जंगल राखणे हा ही स्थिति सुधारण्यास उपाय आहे असें डा. व्होएलकर यांनी फार आग्रहाने सुचविलें आहे. बहुतेक प्रांतांत शेतकीचे काम वैलावरच होतें. हँसूर संस्थान, मद्रास इलाख्यांतील कर्नुल व नेलुरजिल्हे, मध्यप्रांत, मुंबई इलाख्यांतील गुज. राथ प्रांत, पंजाबांत हरियाणा या ठिकाणी बैलाच्या. जाति चांगल्या आहेत. घोड्यांचेसंबंधाने पाहतां, लष्करांत पूर्वीप्रमाणे घोड्यांचा खप नसलेमुळे बंगाल व मद्रास प्रांतांतील घोड्यांच्या प्राचीनच्या जाती नष्ट झाल्यासारख्या आहेत. मुंबई इलाख्यांत दक्षिणेत व काठेवाड प्रांतांत घोडे चांगले होतात व या प्रांतांत सरकारांनी वळू घोडे ठेवले आहेत. पंजावांत व बलूचिस्थानांत मात्र उत्कृष्ट घोडे उत्पन्न होतात व हेच लष्करामाठी घेण्यांत येतात. ब्रह्मदेशांत व मणिपु. रांत उत्कृष्ट तट्टे होतात, ती पोलो नामक खेळास उपयोगी पडतात. तो खेळ मूळचा मणिपुरांतीलच आहे. जनावरांच्या व पिकांच्या रोगांचे निदान शोधण्याचे व उपाय करण्याचे संबं. धाने अलीकडे प्रयत्न चालू आहेत. पशुवैद्य तयार करण्यासाठी शाळा स्थापन करण्यांत आल्या आहेत व एक पशुवैद्यकी खातेही स्थापन केले आहे. जनाव- रांची स्थिति सुधारावी व चांगले प्रकारची गुरे तयार करण्यास प्रोत्साहन द्यावें ह्मणून ठिकठिकाणी गुरांची प्रदर्शने करून बक्षिसे देण्यांत येतात; व ठिकठिकाणी वळूही ठेवण्यात आले आहेत.