पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२० ) पाहिजे आहे. असे प्रकारे ह्या ज्ञानाचा प्रसार होणे फार अगत्याचें होत चालले आहे. आतां लागवडीलायख असलेली जमीन बहुतेक लागवडीस आलेली आहे, ती संपल्यावर हवीतशी वाढवू असें ह्मणतां येण्यासारखें नाहीं; लोकसं- ख्या मात्र वाढत जाणारी आहे, तेव्हां त्यांचे निर्वाहासाठी अन्नाचा सांठा हल्ली लागवडीस आलेले जमिनीपासून जास्त पीक होईल असें करून वाढविला पा- हिजे. शेतकीत सुधारणा कोणते दिशेने करण्याची या बाबतींत शेतक- री अगदीच अनभिज्ञ आहेत असे नाही. विहिरीचे बागाईत पूर्वीपासून आहेच, परंतु सरकारांनी पाटाचे पाणी आणून देतांच त्याचा उपयोग शेतक-यांनी ला- गलीच केला, त्याची वृद्धि हवीतशी होत नाही याचे कारण त्यांची गरीबी हे होय. पूर्वी नसलेली पुष्कळ पिकें आतां या देशांत होतात ही गोष्टही शेतकरी सुधारणा करण्यास तयार असतात याची साक्ष देते. खतांचे महत्व त्यांस मा- हीत आहे व चांगले उंची पिकांस त्याचा उपयोगही ते करतात. आजपर्यंत शेतकी सुधारण्याचे बाबतींत प्रयत्न सरकारतर्फे झाले ते सर्व एकदेशी ह्मणजे परदेशांतील पिकांच्या जाती इकडे आणणे व परदेशी आते इकडे सुरू करणे असे प्रकारे नुसतें अनुकरण करण्याचे मार्गाने झाले; या देशांतील स्थितीचे मानाने योग्य असा त्या क्रमांत केरफार करण्यांत आला नव्हता, त्या- मुळे त्या प्रयत्नांपासून व्हावा तसा उपयोग झाला नाही. त्यापेक्षां इकडील पिकांच्या जाती सुधारण्याचा प्रयत्न झाला असता तर जास्त फायदा झाला असता. परदेशी बियाणे इकडे आणण्यापेक्षां इकडील जातीच सुधारल्याने जास्त फायदा होतो असें चहाचे लागवडीत पूर्णपणे निदर्शनास आले आहे. आतां निराळे पद्धतीवर व्यवस्था चालली आहे. पूर्वीची नमुन्याची शेतें आ- तां काडून टाकून त्यांचे बदली शेतकाचे सुधारणेसाठी जे उपाय उपयुक्त वाट- तात त्यांचा अनुभव पाहण्यासाठी शेते ठेवण्यात आली आहेत. विलायतेहून शेत- कीचे संवंधाने शास्त्रीय ज्ञान ज्यांस आहे असे विद्वान लोकांस इकडे आणवून त्यांचे- कडून इकडील शेतकीच्या तन्हा व इकडे कोणत्या सुधारणा करणे योग्य आहे याबद्दल चौकशी करण्यांत येत आहे. सन १८८९ साली हिंदुस्थानचे स्टेट- सेक्रेटरी साहेबांनी डा० व्होएल्कर, विलायतेंतील कृषिकर्मोत्तेजक सभेचे रसा- यनशास्त्रासंबंधनें मसलतगार, यांस या देशांतील शेतकीची सुधारणा कशी करतां येईल व रसायनशास्त्रोक्त प्रयोग कितपत उपयोगांत आणतां येतील याबद्दल शोध करण्यासाठी इकडे पाठविले होते. त्यांनी या देशांत सुमारे सवा वर्ष राहून व वेगळाले प्रांतांत प्रवास करून शेतकीचा अनुभव घेतला व एक रिपोर्ट कैला. या रिपोटीतील सूचना कोणते रीतीने अमलांत आणतां येतील या