पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१९) संख्येचें उदरनिर्वाहाचे साधन जी शेतकी ती फार महत्वाचा विषय आहे हे उघड आहे. शेतकीखातें-शेतकीसंबंधाने माहिती मिळविण्याचे काम सरकारांतून अगदी अलीकडे चालू झाले आहे. सरकारचे या विषयाकडे लक्ष सन १८६६ चे ओरिसा प्रांतांतील दुष्कळामुळे गेलें ; आतां सर्व प्रांतांत शेतकीसंबंधानें स्वतंत्र खाती स्थापन झाली आहेत. या खात्यांकडे (१) शेतकीचे व सांपत्तिक स्थितीचे संबंधानें व्यवस्थित रतिीने माहिती मिळविणे व ती प्रसिद्ध करणें ; (२) शेतकी व धान्याचा संग्रह यांचे सुधारणेसंबंधाने प्रयत्न करणे; (३) दुष्काळाचे वेळी व्यवस्था करणे व त्यासाठी जरूर ती माहिती पूर्वी गोळा करून तयार राखणे ही कामें सोंपविलेली आहेत. शेतकीची माहिती मिळविण्याचे काम गांवकामगारांचे मार्फतीने, व ते कामगार जेथें नाहींत अशा प्रांतांत इतर रीतीने चालू आहे. सांपत्तिक द्रव्यांचे संबंधाने सरकारांनी माहिती मिळ- वून डाक्तर वाट यांचेकडून एक मोठा कोश तयार करविला आहे. शेतकीची सुधारणा-शेतकी खात्याची स्थापना लार्ड मेयो साहेबांचे कारकी- र्दीत झाली; शेतकीचे सुधारणेसंबंधाने त्यांनी अभिप्राय दाखल केलेला आहे तो फार मनन करण्यासारखा आहे. तो असाः-आणखी पुष्कळ पिढ्या या देशा- च्या संपत्तीची व सुधारणेची प्रगती शेतकीचे सुधारणेवर अवलंबून राहणार आहे, व परदेशांशी ज्या पदार्थांचा व्यापार होण्याचा त्यांत शेतकीचें उत्पन्न हेच मुख्य असणार आहे; तेव्हां व्यापारवृद्धि होण्यास शेतकीची सुधारणा करून उत्पन्न वाढविण्याची तजवीज केली पाहिजे व त्याचे गुण वाढविण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत; तसेंच नवीन प्रकारची धान्ये व कलाकौशल्यास व कारखान्यांस उपयोगी पदार्थ उत्पन्न करविण्याचा उद्योग केला पाहिजे. या गोष्टी घडवून आगणें सरकारास अगत्याचे आहे, कारण या देशांत सरकार हे नुस्ते राज्यव्यवस्था पाहणारेच नसून जमिनीचे मालकही आहेत वगैरे. शेतकीची सुधारणा हे या खात्याचे हातांतील कामांपैकी दुसरे काम आहे; परंतु त्यासंबंधाने अशा सामान्य वर्णनात्मक पुस्तकांत विशेष सांगता येण्यासा- रखें नाहीं; फक्त अलीकडे या बाबतीत कोणत्या दिशेने प्रयत्न चालू आहेत तें मात्र सांगतां येईल. या देशांत वेगळाले प्रांतांत वेगळाले प्रकारच्या जमिनी, दक्षिण प्रांतांतील काळ्या ज-िनी, कर्नाटकांतील उंचवट्यावरील कोरड्या जमि- नी, पंजावांतील व सिंध प्रांतांतील वालुकामय जमिनी या सर्व वेगळाल्या वर्गा- च्या आहेत व यांत पिकेही वेगळाले रीतीने करावी लागतात. तें ज्ञान अनु- भवाने शेतकऱ्यांस चांगले आलेले आहे; तरा तें ज्ञान आणखी पुष्कळ वाढविलें