पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१८) सांगितले आहेच. फक्त कलकत्ता व मुंबई ह्या दोन शहरांतच सर्व कराचे जमे- पैकी २७ टक्के जमा येते; कर देणारे लोकांवर सरासरीने प्रत्येकी रुपये ८० वसतात, व दर दहा हजारी कर देणारे २९८ लोक पडतात. सन १८८६-८७ साली कर देणारे लोक ३ लक्ष ९७ हजार होते व सन १८९१-९२ साली ४ लक्ष ३ हजार होते. २२ कोटि प्रजेपैकी शेतकीशिवाय ५०० रुपयांहून जास्त प्राप्ती असणारे इसम चार लक्षच होते. एकंदर कर दे- णारे लोकांपैकी दोन हजारांपेक्षा कमी उत्पन्नाचे शेकडा ८७ होते व वरचे उ- त्पन्नाचे १३ होते. यांपैकी पहिल्या वर्गाचे लोक एकंदर करापैकी ३९ टक्के व दुसरे वर्गाचे ६१ टक्के देतात. या करासंबंधानें जी माहिती मिळविण्यांत आलेली आहे तिजवरून पाहतां कर देणारे लोकांची एकंदर प्राप्ती ६९३ कोटी असावी असे दिसते. इंग्लंड व वेल्स देशांतील ४१५ कोटी उत्पन्नाचे मानाने ही फारच कमी दिसते, परंतु यासंबंधा- ने या देशांत व्यापारवृद्धि होऊं लागून फारच थोडे दिवस झाले आहेत व वि- लायतेस पिढ्यानुपिढ्या व्यापार वृद्धिंगतच होत गेला आहे हे लक्षांत वागविलें पाहिजे. भाग अकरावा. शेतकी व हवामान. सन १८९१ चे मनुष्यगणतीत शेतकीवर निर्वाह करणारे लोकांची संख्या १७ कोटि ५३ लक्ष भरली आहे. याशिवाय मनुष्यगणतींत मजूरदार ह्मणून जे दाखल आहेत यांपैकी बहुतेक शेतकीचीच मजुरी करतात ; त्यांची संख्या २ कोटी ५४ लक्ष वरील संख्येत मिळविली ह्मणजे एकंदर लोकसंख्येपैकी शेतकविर निर्वाह करणारे लोकांची संख्या शेकडा ६९.९२ पडते. साली हे प्रमाण शेंकडा ६८.५ होतें, व सन १८८१ साली शेकडा ७२ असे होतें. फामिनकमिशनचे चौकशीत असे निष्पन्न झाले की, खेडेगांवीं रहा- णारे लोकांपैकी शेकडा ९० ह्मणजे एकंदर जनसंख्येपैकी शेकडा ८० प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने शेतकीवर निर्वाह करतात. तेव्हां एवढ्या मोठ्या लोक- सन १८७२