पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१६ ) व इलाख्यांचे शहरांतील लोक यांचेशिवाय वाकीचे लोकांवर आकारणी चरोवर करण्यास साधनें फार अपुर्ती असतात. बाहेरचे लोकांजवळ फार करून हिशेब ठेवलेले नसतात व असले तरी त्यापासून व्यापाराची स्थिति दुसऱ्यास सगळी समजू नये असे प्रकाराने ठेवलेले असतात, यामुळे कराची आकारणी करणाऱ्यांसही अडचण पडते व कर ज्यांचवर बसला आहे त्यांचीही कुरकुर राहते. कंपन्यांचे उत्पन्न बरोबर समजतें ह्मणून त्यांचेवर कराचा बोजा बाहेरगांवचे व्यापाऱ्यांचे मानाने जास्त वसण्याचा संभव असतो. दुसरी एक गोष्ट अशी आहे की, हा कर देणारे लोकांची यादी व उत्पन्नाचे आंकडे तयार झाले असले ह्यणजे हवे त्या वेळी या कराचे उत्पन्न वाढवितां येण्यास सवड असते, ह्मणून कर वाढविला तर उत्पन्न होण्यासारखी रक्कम असेल ती प्रसंग पडला असता उपयोगी पडण्यासाठी लोकांजवळ हाता- चेगळी ठेवलेली रक्कम असें विलायतेस समजतात; व एखादे साली खर्चास तूट आली ह्मणजे हा कर वाढवून ती उत्पन्न करून घेतात. तीच स्थिति इकडेही वेळोवेळी होण्याची भाति आहे ; हा कर इकडे सुरू झाल्यापासन तसा प्रकार कांही वेळी झालेला आहे. योग्य आकारणी झाली नाही तर तकरार करून ती दुरुस्त करून घेण्यास मार्ग ठेवला आहे व लोकही त्याचा उपयोग करून घेतात. एकंदर तपासणीत शेकडा ५ टक्के कर कमी होतो असें दिसतें. ह्या कराचे उत्पन्न लोकसंख्येचे मानाने फार कमी आहे, याचे कारण असें आहे की, या देशांत शेतकीवर निर्वाह करणारे लोकांची संख्या फार मोठी आहे व गांवचे उपयोगी पडणारे कामकरी लोकांस मेहनतान्याबद्दल शेतेंच मिळालेली आहेत; या लोकांचे प्राप्तीवर हा कर नाही. शहरांत राहणारे लो- कांची संख्या शेकडा सुमारे ९६ आहे. प्राचीन ग्रामपद्धतींत कलाकौशल्यावर निर्वाह करणारे लोकांची मान्याताही कमीच होती. अलीकडेच या लोकांचे स्थितीस बहडती कळा आहे व तीही इंग्रज सरकाराकडून सर्वांचे सारखें संर- क्षण होऊ लागल्यानंतरची आहे. तेव्हां कर वसूल होण्याचा तो साधारण प्रतीचे मोठे गांवांतूनच होतो. या कराचें सन १८९१-९२ साली निवळ उत्पन्न एक कोटी एकसष्ट लक्ष झाले. सन १८८६-८७ पासून सुमारे तेहतीस लक्षांची वाढ झाली आहे. खर्च पूर्वीपेक्षां सुमारे दोन लक्ष रुपये कमी लागतो. सन १८९१-९२ साली या करापासून उत्पन्न किती झाले ती माहिती खाली