पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१५) चे कारकीर्दीतही धंदेवाले लोकांवर मोहतर्फा व कांहीवर सायरवाब असे कर असत. मद्रासइलाख्यांत मोहतर्फा सन १८६० सालापर्यंत घेण्यांत येत होता; मुंबईकडे सन १८४४ साली मिठावरील कर वाढविण्यांत आल्यावर मोहतर्फा सोडण्यांत आला ; मध्यप्रांतांत पांढरी ह्मणून कर घेण्यांत येत असे, तो अजू- नही चालू आहे. बंगालप्रांतांत सायरबाब कायमची दरठरोती झाल्या- वर सुटली. बंडामुळे कर्ज फार झाले व खर्च वाडला तेव्हां प्राप्तीवरील कर बसविण्यांत आला. बंडाचा मोड करून स्वस्थता करण्यांत बेचाळीस कोटींवर खर्च आला होता, व राज्यव्यवस्थेचे प्रत्येक खात्यांत सुधारणा करण्यात आल्या होत्या व त्यांमुळेही खर्च वाढला होता ; व तिजोरीत तर टंचाई झाली होती तेव्हां मिस्तर वुइलसन् , त्या वेळचे हिंदुस्थानचे फडणीस, यांनी हा कर विलायतेचे नमुन्यावर सुरू केला. तो कर शेतकी, धंदे, व्यापार, नौकरी वगैरे सर्व प्रकारचे प्राप्तीवर बसविला होता. त्या वेळी ५०० रुपयांवरील प्राप्तीवर शेकडा ४ रुपये व दोनशेपासून ५०० पर्यंतचे प्राप्तीवर शेकडा दोन रुपये कर बसवि- ण्यांत आला होता. यानंतर दरांत वारंवार फेरफार झाले व हा कर सन १८७३ साली अजीबात सोडून देण्यात आला. पुढे दुष्काळ पडल्याने तिजोरीत खड्डा पडला तेव्हां सन १८७८ साली दुष्काळापासून देशाचे संरक्षण व्हावे ह्मणून धंदे व व्यापार यांपासून होणारे प्राप्तीवर कर वसविण्यांत आला, व पुढे शैतकी- शिवाय सर्व प्रकारचे प्राप्तीवर तो सन १८८६ त बसविला. असे प्रकाराने या वेळी कर वाढविण्यास कारण देशाचे संरक्षणाचा खर्च वाढविण्यांत आला होता ते झाले व आता हा कर जमेची नेहमींची बाव असें ठरले आहे. हा कायदा सन १८८६ चा दुसरा आहे व तो अजून अमलांत आहे. त्यांतील मुख्य मुद्दे असे आहेत की, रुपये ५०० खालील प्राप्तीवर कर नसतो, दोन हजारांपर्यंत प्राप्तीवर दररुपयास ४ पै व पुढे ५ पैप्रमाणे घेण्यात येतो. लष्करी खात्यांत माफीची मर्यादा सहा हजारांपर्यंत आहे. सरकारास दिलेले कर्जावर व्याज मिळतें त्यावरही कर घेण्यात येतो; परंतु सर्व मार्गांनी एका इसमाची प्राप्ती जर दोन हजारांखाली असेल तर या व्याजावर कर घेण्यात येत नाही. नौ- करीचे पगारावर दर वर सांगितल्याप्रमाणे आहेत व दुसरे प्रकारचे प्राप्तीवर कर दोन हजारांपर्यंत कांही ठरीव दराप्रमाणे घेण्यांत येतो व लावराल प्राप्ती- वर पांच पैप्रमाणे घेण्यांत येतो. शेतकीचे प्रातीवर हा कर नाही. हिंदुस्थानांत प्रत्यक्ष कर बसवितांना कोणते तरी प्रकारची अडचण अस- तेच. प्राप्तीवरील कराचे संबंधाने असें होतें की नौकर लोक व कंपन्या