पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१४) १६ सन १८८२ सालांत ब्रह्मदेश व कोहाक शिवायकरून बार्काचे सर्व हिंदुस्थानांत ८२ पौंडांचे मणास २ रुपये असा करण्यांत आला होता, तो सन १८८८ साली रु.२३ करण्यांत आला. ब्रह्मदेशांत सन १८८८ सालापर्यंत १ रुपयास थोडा कमी असा कर होता, तो त्या साली एक रुपया करण्यांत आला. कोहाक प्रांतांत १०२ पौंडांस आठ आणे दस्तुरी आहे. दरमाणशों मीठ किती खपतें हे काढण्याचे बहुधा कठीण आहे. उत्तरहिंदुस्थानांतील लोकांस सामान्यपक्षी मीठ कमी लागते ; त्याचे मानाने मुंबई व मद्रास या इलाख्यांत मीठ जास्त खाण्यांत येते. सामान्यपक्षी माणशी मीठ किती लागतें तें खालील आंकड्यांवरून दिसून येईल. सन १८८१-८२ सन १८९१-९२ मुंबई पौंड १०३ १२ मद्रास पौंड १५ (उत्तरचे तीन जिल्हे व मलबार शिवाय) बंगाल पौंड. १२ मिठाचा खप व कराचे उत्पन्न यांचे गेले १० वर्षांचे प्रमाण पाहतां, उत्तर- हिंदुस्थानांत सन १८८१-८२ चे मानाने सन १८९१-९२ साली खप एक पंचमांशाने व उत्पन्नही त्याच प्रमाणाने वाढले आहे. मुंबईइलाख्यांत खप व उत्पन्न यांचे प्रमाण दिढीने वाढले आहे. मद्रासइलाख्यांत सवाईनें वाड आहे. बंगाल्यांत दोन्ही बाबतीत विशेषसा फरक झाला नाही. सर्व हिंदुस्थानांतील प्रमाण पाहिले तर खपाचे वाढीचे प्रमाण शेकडा २५ आहे व उत्पन्नाचे वाढीचे प्रमाण शेकडा १७ आहे. बंगाल्यांत, चेशायरमधून मीठ येतें ह्मणून वर सांगिः तलेच आहे. अलीकडे हिंदुस्थानांतील मीठ बंगाल्यांत पूर्वीपेक्षा जास्त खपते व जर्मनी व अरवस्थानांतूनही मीठ येते, यामुळे चेशायरचे मिठाचें मान पूर्वी- पेक्षा कमी झाले आहे. पोटभाग आठवा. आकारलेले प्रत्यक्ष कर. या भागांत जमा वाढविण्यासाठी लोकांची प्राप्ती आणि जीवनाची साधने यांचे मानाने त्यांजवर बसविलेले प्रत्यक्ष करांबद्दल सांगण्याचे आहे. असे प्रका- रचे प्रत्यक्ष कर इंग्रज सरकारांनीच पहिल्याने बसविले आहेत असे नाही. पूर्वी-