पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्लंड व वेल्स [१८९१ ] ४९८ हंगारी [१८८० ] १२५ स्काटलंड [१८९१] १३२ जर्मन राष्ट्र[ १८९० ] २३७ आयलंड [१८९१] १४४ प्रशिया [१८९० ] २२३ फ्रान्स [१८९] १८६ हालंड [१८८९ ] इटली [१८८०] २४९ वेलजम् [१८९० ] ५४० आस्ट्रिया [१८८० ] १९१ पोर्चुगाल [ १८७८ ] १३४ बंगाल्यांत लागवडी दरएकरास दोन मनुष्य असें प्रमाण वसते; ह्मणजे दर- मैली १२८० पडतात. मैली ६४० वस्ती असते तोपर्यंत साधारण ठीक असते, परंतु त्यावर मान गेलें ह्मणजे हाल होऊ लागतात. काही प्रांतांत वस्ती लागवडी जमिनीचे मानाने फार आहे व काही ठिकाणी जमीन पुष्कळ पडलेली आहे, तरी तसे प्रदेशांत जास्त वस्ती सावकाश होते, कारण हिंदूंत आपला देश सोडण्याची प्रवृत्ती फार कमी आहे. यास प्रमाण हे की लोकसंख्येपैकी शें- कडा ९० इसम आपले जन्माचेच प्रांतांत रहात आहेत असें सन १८९१ चे मो- जणींत दिसून आले आहे. सन १८७१ सालापर्यंत मनुष्यगणती पद्धतशीर अशी झालेली नव्हती. त्या सालापूर्वीचे काही सालांतील जनसंख्येचे आंकडे खाली दिले आहेत ते अज- मासाचेच आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत इंग्रजी राज्याचा विस्तारही पुरा झाला नव्हता; नवीन नवीन प्रांत वरचेवर त्यांत सामील होत होते, यामुळेही पूर्वीचे आंकडे तुलनेसाठी फारसे उपयोगी नाहीत. त्यांवरून फक्त स्थूल अशी अनुमानें मात्र काढतां येतील. क्षेत्र-चौरसमैल लोकसंख्या कोटींत. १८५१-५२ ७७६००० १५.४७९ १८६१-६२ ८५६००० १७.९१३ हिंदुस्थानांतील इंग्रजी राज्यांतील प्रांत घेतले तर वाढीचे प्रमाण गेल्या दहा सालांत शेकडा ९.७६ पडत आहे व सर्व देशाचा विचार पहातां तें शेकडा १०१७ पडतें हें वर सांगितले आहे. सर्व देशभर सारख्याच प्रमाणानें लोकसंख्या वाढत नाही. वस्ती दाट असेल किंवा पातळ असेल त्या मानाने वाढ कमी किंवा जास्त होते. हवेचा फेरफार हा काही अंशी वाढीस उत्तेजक किंवा प्रतिवं- धक होतो, परंतु हे फरक व अशा प्रकारची दुसरी कारणे बाजूस ठेऊन विचार केला असता असे दिसते की, वस्ती पातळ असेल तेथील लोकसंख्या दाद वस्तीचे भागांतल्यापेक्षा जास्त प्रमाणाने वाढते; मैली १०० वस्ती असेपर्यंत