पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २११) होता व त्यांत इकडील स्थितीस अनुलक्षून पक्षकारांस व व्यापायांस सोईचा होईल अशी व्यवस्था करण्यांत आली होती. टांप दोन प्रकारचे आहेत. एक न्यायाचे कामास लागणारे व दुसरे व्यापा- रव्यवहाराचे कामास लागणारे ष्टांप. न्यायखात्यांतील उपयोगाचे तिकिटांचे दर सन १८७० सालचे सातवे कायद्यावरून ठरलेले अजून चालू आहेत. व्यापा- री टांपाबद्दल कायदा सन १८७९ चा पहिला आहे. सावकार लोक वाईट सालांत घेतलेले रोख्यावरून चांगले सुगीचे साली दावे करतात, तेव्हां टांपांचें उत्पन्न वाढेल तें साल शेतकरी लोकांस चांगले असे समजावे असा काहींचा समज आहे; परंतु त्याचे खरेपणाचा प्रत्यय उत्पन्नाचे कोष्टकावरून येत नाहीं व तो येण्यासारखाही नाहीं; कारण सर्व हिंदुस्थानांत ह्मणजे एकदम पुष्कळ पाऊस पडतो किंवा वाईट पीक येते असे होत नाही. चांगले पीक आले ह्मण- जे कुळे सावकाराची फेड करीतच नाहीत असेंही मानण्यास आधार नाही; तसेंच वाईट साली सावकार आपले पुढील फायद्यावर नजर ठेऊन कुळांस आप- ले कबजांत आणून ठेवीत नसतील असेंही ह्मणतां येत नाही. तेव्हां या बा- वतींत निश्चित असें कांहीं अनुमान करतां येत नाही. या उत्पन्नाचे प्रांतवार लोकसंख्येशों प्रमाण पहातां मुंबई व वंगाल प्रांतांत दरमाणशी इतर प्रांतांपेक्षा जास्त प्रमाण बसते व उत्पन्नाचे वाढीचे मानानें प- हातां मुंबई व मध्यप्रांत यांचा नंबर वर येतो. सन १८८१-८२ व १८९१-९२ सालांबद्दल टांपाचे जमेची व खर्चाची माहिती पुढे लिहिल्याप्रमाणे:- जमा. १८८१-८२ रुपये. कोर्टफीष्टांपाची विक्री २३०१५११० जनरल ष्टांपाची विक्री १०१९८९१० इतर प्रकारे उत्पन्न xपैकी वजा परत दिलेल्या रकमा -३७७०७० १८९१-९२ रुपये. २८८७७७४० १२९७२८१० ७७१०१० -४७१९८० एकूण जमा ३३४३६६५० ४२१४९५४० x १२९ पानावरील कोष्टकांत परत दिलेल्या रकमा खर्चात दाखल केल्या आहेत व येथे जमेंत वजा घातल्या आहेत.