पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारण होय. (२०८) आहे. या प्रकारे पिछेहाट होण्यास जमेचे मानाने खर्चास घेणारी तूट हे वर या जकातीविरुद्ध जी कारणे दाखविण्यांत येतात ती दिली आहेत. आता हा कर पूर्वी घेण्याचे सुरू असतांना त्याचे समर्थनास जी कारणे देण्यांत येत असत. व ज्यांची हल्लीं कर वसवितांना पुनरुक्ति करण्यांत आली आहे, ती देऊन हा विषय पुरा करण्याचा आहे. ती कारणे अशी की पांच टकया- सारखे हलके जकातीपासून देशी व्यापारास उत्तेजन मिळतें असें होत नाही; व अप्रतिक व्यापाराची तत्वें लागू करतांना त्या देशाचे जमाखर्चाचे संबंधाने स्थिति कशी आहे याकडे नजर ठेविली पाहिजे; जमाखर्चाची स्थिति चांगली असल्याशिवाय अप्रतिहत व्यापाराची तवें लागू करणे हे बरोबर ना ही ; व या जकातीबद्दल विचार करतांना ती सोडली तर एकंदर देशाचे जनेंत राज्य- कारभार चालण्यासारखा आहे किंवा नाही हे मुख्यत्वेकरून पाहेले पाहिजे वगैरे. नवीन बसविलेले आयात मालावरील जकातीपासून सर्चवेंच वजा जातां बाकी निव्वळ उत्पन्न एक कोटि वीस लक्ष होईल असा अंदाज कायदा करतांना घरला होता. १८१४-९५ चे वजेटांत आयात व निर्गत मालवरील जकाती- पासून दोन कोटि चवऱ्याशी लक्ष रुपये उत्पन्न होईल व एकंदर कष्टम खात्याचें निव्वळ उत्पन दोन कोटि सहासष्ट लक्ष हेईल असा अंदाज धरला आहे. आयात मालावरील जकात फिरून बसविली त्या वेळी कापसाचे केलेले मालावर जकात वसविली नव्हती व हे लोकांस पसंत पडले नव्हते. त्यांचें ह्मणणे असे होते की, खर्चाचे नडीमुळे जकात जर बसविणे जरूर झाले तर ती एखादे प्रकारच व्यापारास मेहेरबानी न दाखवितां सर्व मालावर सारखी बसविली पाहिजे. ब्राडफर्डचे लोकरी कापडास, स्टाफर्डचे लोखंडास जर जकात आहे तर ती मांचेस्टर येथील कापडास नसावी हे बरोबर नाही. त्या मालास अशी माफी दिल्याने विलायतचे व्यापा-यांचे फायद्यासाठी हिंदुस्थानचे हिता- हिताचा विचार होत नाही असा समज होईल. पांच टक्यांपर्यंत आवात माला- वर जकात बसविल्याने देशांत उत्पन्न होणारे मालास उत्तेजन दिल्यासारखें होत नाही व ज्या त-हेचा माल विलायतेहून येतो तसा माल या देशांत बहु- तेक उत्पत्रही होत नाही, असा कर वसविल्याने नुकसान या देशांतील लोकांचें आह व ते सोसण्यास कबूल आहेत. जमा व खचाचे वावतांत सरकारांनी दिंदु- स्थानचे हीताचा विचार करूनध वर्तन ठेविले पाहिजे. यासंबंधाने सरकारतर्फे ह्या मालावर जकात न वसविण्याची कारणे सांग-