पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०७) थोड्या आयात जालावर जकात घेण्यांत येते तिची दरसाणशों सरासरी बारा शिलिंग पडते व हिंदुस्थानांत जकात देणारे मालाची यादी जरी मोटी थोरली आहे तरी दस्तुरी दरमाणशी सरासरी तीन पेन्स पडते; यावरून विलायत व हिंदुस्थान यांतील व्यापाराची कशी स्थिति आहे, हे दिसून येते. हिंदुस्थानची गरीबी, कलाकौशल्याचे संबंधाने मागसलेली स्थिति व विशेष प्रकारची राज्यकीय स्थिति यांमुळे या देशाचा माल परदेशांचे मालाशां अदला- बदल होण्यास आतिशय सवड द्यावी लागते." या उता-यावरून आयात व निर्गत मालावरील जकात घेण्याचे संबंधाने जी मूलतत्वे आहेत ती समजून येतील. या जकातीस वर जे आक्षेप सांगितले आहेत त दारू, मीठ व अफू या पदार्थावर घेण्यांत येत असलेले जकातीस व- रील नियमाप्रमाणे लागू पडत नाहीत, कारण त्या पदार्थांवर या देशांतही दस्तुरी घेण्यांत येते. या कारणांसाठी इतर मालावरील जकात जरी कमी करण्यांत आली, तरी हत्यारे, दारू, मीठ व अफ यांवरील आयात जकात व तांदुळावरी- ल निर्गत जकातही माफ करण्यांत आली नाही. सन १८८१-८२ साली आ- यात व निर्गत मालावरील जकातीचे निव्वळ उत्पन्न २ कोटींवर थोडेसें होतें, तें दस्तुरी माफ झाल्यावर साधारण एक कोटीवर आले. सन १८१-९२ साली हे उत्पन्न सुमारे दीड कोटीचे जवळ जवळ होते. या देशांत आयात व निर्गत मालाची किंमत सन १८४० साली २१ कोटि रुपये, १८५० सालों ३२ कोटि, १८६० साली १३८ कोटि व सन १८९१-९२ साली १९५ कोटि, रुपये होती. ही सर्व वाढ आयात मालावरील जकात माफ झाल्यानेच झाली असें नाहीं; तर माल निर्गत जास्त होण्यास आगगाड्या वगैरे साधने झाली आहेत व निर्गत होणारा मालही जास्त उत्पन्न झाल्याने व विला यतेंतील शिलकी मालाची किंमत उतरल्याने ही वाढ झाली आहे. कर माफ होणे हे काही अंशी वाढीस कारण आहे. वेथपर्यंत या कराबद्दलची सन १८८२ पर्यंतची हकीकत झाली. त्या साली आयात जकात माफ झाल्याने अप्रतिहत व्यापाराची तत्वे हिंदुस्थानास पूर्णपणे लागू झाली, व ही स्थिति सन १८८८ पर्यंत पूर्ण जारीत होती. सन १८८८ साली पेनालियमवर दरग्यालनास अर्धा आणाप्रेमाणे जकात बसविण्यांत आली तेव्हांपासून मार्च १८९४ पर्यंत या बाबतीत काही कमी जास्ती झाले नव्हते. सन १८९४ चे मार्च महिन्यांत १८७५ साली ज्या जिनसांवर जकात घेण्यांत येत असे त्या जिन्नसवारीत काही फरक करून ती जकात बसविण्यांत आली