पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०६ ) असतो ; त्यावर जकात बसल्याने आपले व्यापारास धक्का बसतो व हिंदुस्थानांत वाढत चाललेले गिरण्यास मदत होते अशा अर्थाची तक्रार तेथील व्यापाऱ्यांनी केली. त्यावरून या बाबतीत वादविवाद चालू झाला. सन १८७६ साली लार्ड सालिसबरी हे हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरी असतांना, त्यांनी आयात मालावर कर घेणे हे अर्थशास्त्राचे तत्वांस विरुद्ध असून त्यापासून व्यापारास हरकती उत्पन्न होतात, ह्मणून त्या जकाती घेण्याचे होईल तितक्या लवकर रहित करावे असें फर्माविले. तसेंच सन १८७७ साली हाउस ऑफ कॉमन्सने कापसाचे मालावरील जकात, हिंदुस्थानचे पैशाचे संबंधाने स्थितीचा विचार करून, होईल तितकी लव- कर रद्द करावी असा ठराव केला, व त्याप्रमाणे लॉर्ड लिटन् यांचे कारकीर्दीत सन १८७८ साली कांही बाबतींत व लॉर्ड रिपन यांचे कारकीर्दीत सन १८८२ साली बहुतेक बाबतीत आयात मालावरील जकात सोडण्यांत आली. आयात मालावर व निर्गत मालावर जकात घेण्याचे संबंधानें कांही मूलतत्वें ठरलेली आहेत ती अशी-(१) एखादे देशांत जो माल उत्पन्न होतो त्या प्रकारचा माल परदेशांहून येईल तर त्यावर दस्तुरी घेण्यांत येऊं नये; कारण अशी दस्तुरी देशांत होणारे मालास संरक्षण (प्रोटेक्टिव्ह ) होते. तसा कर आयात मालावर घेणे झाल्यास देशी मालावरही कर बसविण्यात यावा. (२) होतां होईतोपर्यंत व्यापारोपयोगी कच्चे मालावर जकात घेण्यांत येऊ नये. (३) कर बसविण झाल्यास ज्या पदार्थावर कर वसविला असतां खर्चवेंच वजा जातां उत्पन्न बरेचसे होईल, असे पदार्थावर मात्र वसवावा. (४) निर्गत मा- लावर जकात वसविण्याचे संबंधानें नियम असा आहे की, कर वसविणें तो, जा माल त्या देशांतच विशेषेकरून उत्पन्न होत असेल व खाच देशांतून तो मुख्य- त्वेकरून बाहेर जात असेल, त्यावरच बसवावा. सर जॉन स्ट्रेची यांनी हा कर माफ करण्याचे वेळेस या कराचे बाबतींत वर लिहिलेली तत्वे सांगून शिवाय असे सांगितले की, " हिंदुस्थानांत सांपत्तिक द्रव्ये विपुल आहेत, परंतु लोक गरीब आहेत, त्यामुळे भांडवलाची कमताई आहे; यासाठी देशांतील मालाचा परदेशांत जि- तका खप होईल तितका चांगला; हिंदुस्थानांतून इंग्लंड देशास दर साल बीस कोटींवर रुपये पाठवावे लागतात व त्याबद्दल चापारी रीतीचा मोबदला काही येत नाही; ही रकम विलायतेपासून भांडवल, अक्कल, सामर्थ्य वगैरेंचे संबंधानें जी या देशास मदत होते तिचा मोबदला आहे; या देशाच्या व्यापाराची स्थिति एक विशेष प्रकारची आहे, व त्याची वृद्धीही अजून पुष्कळशी होणे आहे. विलायतेस दरमाणशी आयात व निर्गत मालाची किंमत सरासरीने वीस पौंड पडते, व हिंदुस्थानांत ती फक्त दहा शिलिंग पडते; तिकडे ज्या