पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०१) दुकान ठेवण्याची परवानगी देण्यात येते. नियमित स्थळीच भट्टी आहे किंवा कसें, नियमाप्रमाणे सत्तेदार वागत आहे किंवा कसें व यासंबंधानें सरकार देखरेख ठेवतात. ही आउटास्टिलपद्धति सरकारास पसंत नाहीं; साधेल तशी ती कमी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. बंगाल प्रांतांतील काही भागांत व पं- जावांताल एक दोन तालुक्यांत ही पद्धति चालू आहे, परंतु तेथें ही दारू किती व कोणते गुणाची तयार करावी व भट्टी कशी असावी व किंमत निदान किती व्यावी याबद्दल नियम करून दारूचा प्रसार कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. व्यसनाचे नियमनासाठी मादक पदाथावद्दल बंदोबस्तही करणे जरूर आहे, तसाच जमा उत्पन्न करण्यासाठी आहे. हा कर फार जरब टेवला असलेमुळे वाटेल तेव्हां तो वाढवून त्यापासून जास्त जमा उत्पन्न करण्यासारखी ही वाव नाही. उत्पन्नांत वाढ कशी झाली आहे ती पुढील पत्रकावरून दिसून येईल. ही वाढ होण्यास कारणे अलीकडील सक्त बंदोबस्त व लोकसंख्येची वाढ ही आहेत: मादक पदार्थांचे जास्त खपामुळे ती झालेली नाही. मादक पदार्थापासून उत्पन्न-हजाराचे आंकडे आहेत. सन १८६१-६२रु.१७८६१ १८९१-९२-रु. सन १८७१-७२ रु.२३६९१ १८९२-९३-रु. ५२४२४ सन १८८१-८२रु.३२२७२ १८९४-९५) ५३१७७ अंदाज मादक पदाथांवर कर वसल करण्याचे वावतींत सरकारचे वर्तन काही तत्वां- स अनुसरून असते हे वर सांगितलेच आहे. तो कर वसविण्याचा तो कसे री- तीने वसवावा याबद्दल मतभेद आहे. तसेच या पदार्थांचे खपास सरकारांनी किती प्रतिबंध करावा याबद्दलही तसाच मतभेद आहे. प्रतिबंधाचे प्रश्नाशी धर्मसंबंधी व सामाजिक पुष्कर गोष्टींचा संबंध असल्याने तो प्रश्न फार भानगडी- चा आहे. सर्वस्वी प्रतिप करगे या देशांचे स्थितीचे मानाने शक्य नाही, कारण दारू तयार करण्यास पदा, विपुल आहेत व ती तयार करण्यास साधनें- ही फारच अल्प खर्चात प्राप्त करून घेतां येतात; तसेंच कांहीं जातीत दारू पि- ण्याची इच्छा व संवई फार प्रबल आहेत. दारू कोणी पिऊ नये असा पूर्ण प्रतिबंधक कायदा के 7 तरी, त्याची अंमलवजावणी होणे अशक्य, ह्मणून तो नामशेष मात्र राहील व त्यापासून लोकांचा कायद्यासंबंधानें अनादर मात्र उत्पन्न होईल. एकंदर पिचार पाहतां, दोरू किंवा इतर मादक पदार्थांचे मित सेवनापासून अपाय होतो असें जाणतां येत नाही व दारू मिळेनाशी करून दारू पिण्याचे बंद करण्यापेक्षा, लोकमत योग्य प्रकारचे होऊन व व्यसनी लोकांची व्यसनाचे