पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९९) , वर सांगितलेप्रमाणे दारू तयार करतो. या पद्धतीस " दारू तयार करून देण्याची मक्तयाची पद्धति" (धी सिस्टिम आफ मानॉपली सप्लाय ) असें ह्मणतात. (४) सेंट्रल डिस्टिलरी पद्धतीचा आणखी एक प्रकार मुंबई इलाख्यांत चालू आहे, त्याचा अनुभव पाहून ती सर्वत्र चालू करण्याचा विचार आहे. दारू तयार करण्याची व विक्रीची परवानगी एकाच इसमास जिल्ह्याचे हद्दीपुर्ती किंवा काही विवक्षित हद्दीपुर्ती देण्यांत येते ; मक्तेदाराने दारू तयार करणे ती सरकारांनी स्थापन केलेले भट्टीखान्यांत सरकारी अंमलदारांचे देखरेखीखाली करावी लागते, व त्यास त्या अंमलदारांचा पगारही द्यावा लागतो ; भट्टीखान्यांतून दारू वाहेर नेतांना तिजवर नियमाप्रमाणे कर द्यावा लागतो ; दारू विकण्यास दुकानें किती असावी व कोठे कोठे ठेवावी व दारू विकण्याचे दर किती मर्यादेत असावे हे सरकार ठरवून देतात. दारू तयार करणे व विकणे याचा मक्ता देतात हे वर सांगितलेच आहे; तो मक्ता घेण्यासाठी लोकांकडून अर्ज मागवितात व त्यांत निदान किती ग्यालन दारूबद्दल (भट्टीतील) फी भरण्यान अर्जदार तयार आहे याबद्दल अर्जदाराकडून लिहून घेतात, व जो जास्त दाल्वर फी देण्यास तयार असेल त्यास ती तयार करण्याची व विकण्याची परवानगी देण्यांत येते. निदान कबूल केलेली जी ग्यालनांची संख्या तिजवर फी भरावी लागते व त्यापेक्षा जास्त दारू तयार झाल्यास तिजबद्दल शिवाय फी नियमाप्रमाणे द्यावी लागते. ही पद्धति मुंबई इलाख्याचे बहुतेक भागांत व अजमार प्रांतांत ब. वायव्य प्रांताचे काही भागांत चालू आहे. हीस ग्यारंटीड मिनिमम सिस्टिम ह्मणतात. (५) सेंट्रल डिस्टिलरी पद्धतीचा आणखी एक नमुना आहे तो असा की, वर चवथे प्रकारांत सांगितल्याप्रमाणे निदान अमुक दारूबर फी भरण्यास तयार आहे असें ठरवून घेऊन, जास्त दारूवर फी देण्यास तयार असेल त्यास मक्ता देत नाहीत, तर दारूबर नियमाप्रमाणे फी देऊन शिवाय सर्वात जास्त रकम देण्यास जो तयार असेल त्यास ती तयार करण्याचा व विकण्याचा परवाना देतात. हीस माडिफाइड डिस्टिलरी सिस्टिम ह्मणतात. ही पद्धति मद्रास इलाख्याचे काही भागांत चालू आहे. चा पद्धतीचा अनु- भव ठाणे व कुलाबा जिल्ह्यांत घेऊन पाहण्यांत आला होता, परंतु तिचेपासून विगरपरवान्याची दारू तयार करण्याची मात्र प्रवृत्ति होते असे दिसून आल्यो- वरून तो पद्धति सोडून देऊन चवथे प्रकारची पद्धति चाल करण्यांत आली आहे. याप्रमाणे सेंट्रल डिस्टिलरी पद्धतीचे पांच प्रकार आहेत. मद्रास व मुंबई इलाख्यांत ताडांचे किंवा माडांचे झाडांचे रसापासून दारू