पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९८) दारू तयार करण्यास परवानगी देण्यात येते. त्याने दारू तयार केल्यानंतर भट्टी- तून जी दारू बाहेर विकण्यास नेण्यांत येईल तीवर नियमाप्रमाणे दस्तुरी घे- ण्यांत येते. असे भट्टयांत दारू तयार करण्याचा हक्क मक्त्याने देत नाहीत. तसेंच साधारणतः दारू तयार करण्याचा व विकण्याचा हक है वेगळाले ठेवतात. या प्रकारची पद्धति खालचा बंगाल, वायव्य व अयोध्या प्रांत, व पंजाब प्रांत यांत चालू आहे. ब्रह्मदेशांत युरोपीय पद्धतीवर जी दारू तयार करण्यांत येते तिचेवर या पद्धतीप्रमाणे कर घेण्यात येतो. मध्यप्रांतांत हीच पद्धति चालू आहे, तरी तीत थोडा फरक आहे. या प्रांतांत दस्तुरी घेण्याची ती, तयार झालेले दारूवर न घेतां, दारू तयार करण्यास जो मालमसाला लावण्यांत येतो त्याचेवर घेण्यांत येते. या पद्धतीप्रमाणे तयार झालेली दारू विकण्यासंबंधाने व्यवस्थाही सरकारांनी आपले बंदोबस्तांत ठेवली आहे, ती अशी की दुकानें किती घालावी व कोठे वालावी यावद्दल ठराव जिल्ह्याचे अधिकारी करतात व ते या दुकानांत दारू विकण्याचे परवाने देतात व त्यासंबंधानें फी घेतात. ही फी काही ठिकाणी म- हिन्याचे, काही ठिकाणी वर्षांचे मुदतीने ठरविण्यांत येते. तिची रक्कम कांहीं ठिकाणी लिलाव करून, व काही ठिकाणी टेंडरे (मागणीचे अर्ज) मागून ठरवितात. (२) मद्रास प्रांतांत दारू तयार करण्याचा व विकण्याचा हक्क एक इसमास एकवट करून देत नाहीत. दारूविक्रीचे संबंधाने या प्रांतांत वर सांगितलेप्रमा- णेच वहिवाट चालू आहे. ती तयार करण्यासाठी या प्रांतांत सरकार भट्टी स्थापन करीत नाहीत; तर चांगले योग्यतेचे माणसास भट्टी घालण्यास फी घेऊन परवानगी देतात व त्या भट्ट्यांत सरकारी अंमलदारांचे देखरेखीखाली दारू तयार होते. ही पद्धति या प्रांतांचे बहुतेक भागांत चालू आहे. या पद्धतीस फ्रीसप्लायपद्धति ह्मणतात. या प्रांतांत पूर्वी अशी वहिवाट होती की, दारू वि- कण्यास विवक्षित भट्टीतूनच दारू घ्यावी लागत असे, व ह्लीं चालू असलेले पद्धतीप्रमाणे पाहिजे त्या भट्टीतून ती आणतां येते; ही गोष्ट विशेष रीतीनें निदर्शनास यावी ह्मणून या रीतीस फ्री सप्लाय (निष्प्रतिबंध) असें नांव ठेवलेलें आहे. (३) या प्रांताचे काही जिल्ल्यांत दारू तयार करण्याचा हक्क मक्त याने देण्यात येतो. तो देण्याची रीति अशी आहे की मक्तेदाराने दारू विकणाऱ्यांस ती कोणते दराने चावी हे ठरवितात व ती शर्त पतकरून सरकारास ती तयार क- रण्याचे परवान्याबद्दल दारूचे किमतीचे पैशापैकी जो जास्त अंश देण्यास तयार होईल त्यास तो हक्क देण्यात येतो. त्यानंतर तो मक्तेदार आपले खासगी भट्टीत ..