पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकंदर अगदी थोडे खपापासून जितकी जास्त जमा वसूल करता येईल तितकी करावो असा सरकारचा हेतु आहे. मादक पदार्थांचा प्रसार अप्रतिहत चालू देणे हे देशास हितकर होत नाही, मणून त्या पदार्थाचे व्यापाराचे नियमन करण्याचा अधिकार सरकारांनी आपले हाती ठेवला आहे. सर्व मादक पदार्थ विकण्याचा अधिकार सरकारचाच असे ठरविले आहे व ते तयार करण्याचा व विकण्याचा परवाना कांहीं फी घेउन दे- ण्यांत येतो. अफूबद्दल कशी व्यवस्था करण्यांत आली आहे तें पूर्वी सांगितलेंच आहे. दारूशिवाय इतर मादक पदार्थ विकण्याचे भागा भागावद्दल परवाने दर साल लिलाव करून देण्याची साधारणतः वहिवाट आहे. परदेशी दारू विक- ण्याचे परवाने प्रत्येक दुकानावर सालिना काही रक्कम घेऊन देतात. देशी दारू- वर कर घेण्याचे संबंधाने मात्र वेगळाले प्रांतांत वेगळाल्या वहिवाटी चालू आहेत, त्यांचेबद्दल विस्ताराने वर्णन पुढे देण्यात येईल. साधारण विचार पहेतां त्या वहिवाटींचे दोन वर्ग करता येण्यासारखे आहेत. (अ) पहिले वर्गातील पद्ध- तीत विशेष हा आहे की, एखादे मध्य ठिकाणी दारू तयार करून ती तेथून वा- हेर विक्रीस नेतांना तिजवर नियमाप्रमाणे दस्तुरी घेण्यात येते. (ब) दुसरे वर्गाचे पद्धतीत कर वसूल करणें तो तयार झालेले दारूबर घेण्यात येत नाही; तर मूळ दारू तयार करण्याचा व विकण्याचा हक्क व लिलाव करून घेण्यांत येतो. लिलावां- त आलेले पैसेच अति तो लिलावदार पुढे तयार करील त्या दारूवरील कर होतो. प- हिले वर्गाच पद्धतीस सेंट्रल डिस्टिलरी सिस्टिम (ह्मणजे मध्य ठिकाणी भट्टी ठेवण्याची पद्धति) असें ह्मणतात. दुसरे वर्गाचे पद्धतीस आउटस्टिल (बाहेरील भट्यांची ) व मक्याची पद्धति असें ह्मणतात. या पद्धाते प्रांतिक ठिकाणांचे मानाने निर- निराळ्या प्रकाराने अमलात आणण्यात येतात. पहिले वर्गाची पद्धति हिंदुस्थान- सरकारास विशेष पसंत आहे व ती बहुतेक प्रांतांत भरवस्तीचे व साधारण वस्तीचे भागांत चालू आहे. विरल लोकवस्तीचे, व मार्गगाचे संबंधाने अडचणी- चे व मध्य ठिकाणापासून दूर असलेले भागांत मध्यस्थ भट्टीतून दारू पुरविणे अतिशय खर्चाचे काम होते, तेव्हां असे भागांत ठिकठिकाणी दारू तयार करून विक्री करण्याचे परवाने देण्यात येतात; ह्मणजे अस भागांत दुसरे वर्गाची पद्ध- ति चाल असते. आता वेगळाले प्रांतांत ह्या पद्धति कशा चालू आहेत ते सांगतो. (१) सेंट्रल डिस्टिलरी सिस्टिम अशी आहे की मध्य ठिकाणी एक दारू तयार करण्याचे ठिकाणाची सरकार स्थापना करते व त्या ठिकाणी सरकारांनी पसंत केलेले चांगले योग्यतेचे इसमास सरकारचे अंमलदारांचे देखरेखीखाली,