पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पदार्थ सेवन करू देण्यास दुकानांस परवाने होते ते कमी करण्याच्या किंवा रद्द करण्याच्या तजविजी चालू होत्या; मद्रासइलाख्यांत अफूचे सेवनास प्रतिबंध सन १८८० पर्यंत नव्हता; या साली इतर प्रांतांतलेप्रमाणे या इलाख्यांतही बंदोवस्त करण्यांत आला; तसेंच अफूवरील करही काही प्रांतांत अफूचे व्यस- नाचा प्रसार कमी करण्यासाठी वाढविण्यांत आला होता; अफ विकण्याचें बंद करणे शक्य नाही, कारण संस्थानांत तिची उत्पत्ति करण्याचें बंद करतां येत नाही व उत्तरहिंदुस्थानांतील लढाऊ लोकांस हे व्यसन फारच आहे. एकंदर हिंदुस्थानांत सुमारे ४००००० लोक अफू खातात. पोटभाग तिसरा. एक्साइझ-मादक पदार्थावरील कर. मादक पदार्थांचे सेवनाचा प्रघात काही लोकांत फार प्राचीनकालापासून आहे. एकंदर त पहातां लोक निर्व्यसनी आहेत. मादक पदार्थावर पूर्वीचे कारकीदीत- ही काही कर उत्पन्न करण्यांत येत असे असे दिसते. हा कर देण्याची पद्धत तकरार न येईल असे रीतीने निश्चित करण्यास फार अडचण पडते. त्या कामी प्रश्नही फार भानगडीचे उत्पन्न होतात. देशवैचित्र्य, मादक पदार्थ करण्याचे मूळ पदाथांची विपुलता, व्यसनवश लोकांच्या तन्हा व भिन्न शासनवांत प्रांतांने सांनिध्य यांमुळे निरनिराळ्या पद्धति योजाव्या लागतात व बिनपरवा- न्याने हे पदार्थ तयार करण्यास किंवा दस्तुरी चुकवून नेण्यास सवलतीही फार असलेमुळे बंदोवस्तही फार सावधगिरीने करावा लागतो. ह्या कराचे बाबतीत सरकारचे वर्तन काही तत्यांस अनुसरून असते, तो अशी आहेतः- मादक पदार्थ व पेथे यांवर कर जरव असावा; त्या पदार्थाचा व्यापार सरकारी बंदोबस्ताखाली असावा; हे पदार्थ विकण्याचे दुकानांची संख्या गरजेचे मानाने असावी, व लोकमत कसें आहे याचा तपास करून त्यास अनुरू- न व्यवस्था करण्याचा साध्य असेल तितका प्रयत्न करावा. हा कर जरब धे ग्याचा हेतु या पदार्थांचे सेवनास प्रतिबंध व्हावा हा आहे; तरी फार सक्ती झाली तर व्यसनपरिहार न होतां अन्यमार्गाने हे पदार्थ प्राप्त करून घेण्याची प्रवृत्ति होते, तेव्हां अशी प्रवृत्ति होईल इतका जरब करही घेण्यात येऊ नये,