पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९५) ... १३२३ ७०० अफू आणण्याचे परवाने किती पेट्यांबद्दल दिले व परदेशास किती पेट्या रवाना झाल्या त्याबद्दल माहिती देतो. १८८१-८२ १८९१-९२ १८९२-९३ बंगाल्यांत विक्री पेट्या. ५६४०० ५६२५० ४८८५२ दरपेटीस आलेली किंमत १०५७ १२४७ रु० (आ० पै. गाळून ) मुंबईस माळव्यांतून आणलेल्या पेट्या ३११९६ ३०६५४ २७८४५ फी दरपेटीस ६०० परदेशास किती पेट्या रवाना झाल्या. ८९३३८ ८७५५८ ७५३८४ सन १८९४ सालचे अखेरीस माळव्याचे अफूवरील फीचा दर रुपये ५० नीं जास्त वाढविला. हिंदुस्थान देशांत अफूचा खप किती झाला हे चांगले समजत नाही, कारण की पुष्कळ संस्थानांत अफू त्या त्या ठिकाणचे खर्चासाठी पिकविण्यांत येते, व माळव्याहून परवाने घेऊन कांहीं व्यापारी व संस्थानिक परस्पर अफू घेऊन जातात, यामुळे माळव्यांतून एकंदर अफू या कामांसाठी किती गेली याचा हिशेष लागत नाही. मुंबईत देशांतील खर्चासाठी सन १८९१-९२ साली २४१४२ पाउंड अफू देण्यांत आली होती व पाउंडास दहा रुपये अशी किंमत आली होती. अलीकडे किंमत चार आण्यांनी कमी करण्यांत आली आहे. या इलाख्यांतील बहुतेक भागांत कमिशनर हे प्रत्येक व्हेंडराने अगदी कमीत कमी किती अफू विकली पाहिजे तें ठरवितात; ही मर्यादा आतां व्यापाऱ्यांचे चढाओ- डीने ठरली जात नाही, ही नवीन सुधारणा आहे. बंगाल्यांतील अफू सन १८८१ साली ५२५ हजार पाउंड व सन १८९१-९२ साली ६१७ हजार पाउंड या देशांतील खर्चासाठी देण्यात आली होती. देशांत खपलेले अफूपासून सरकारास सन १८८१-८२ साली रुपये ७९९४५२० व सन १८९१-९२ साली रुपये ९४६५१३० उत्पन्न झाले होते. उत्पन्नाचे वाढीस कारण मुख्यत्वेकरून अली- कडील बंदोबस्त हाच होय; यामुळे पूर्वी चोरून आणलेली अफू खपत असे, तेथे आतां परवान्याची अफू खपते. सन १८९१ साली हिंदुस्थानसरकारचा एक खलिता पार्लमेन्ट सभेस सादर करण्यांत आला त्यांतील मुद्याच्या गोष्टी अशा आहेत की, पूर्वीपेक्षा दुकानांची संख्या कमी झाली आहे; सन १८८९-९० साली वावीस हजार लोकांस अफूचें एक दुकान असे पडलें व अफूपासून होणारे पदार्थांची दुकानें एक लक्ष सत्या- ण्णव हजार लोकसंख्येस एक असे पडले. दुकानांतच अफूपासून तयार केलेले