पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यावा लागतो, त्याजवर इंग्रज सरकारची दस्तरी घेण्यांत येते. वायव्य वगैरे प्रांतांत जी अफू उत्पन्न होते. ती परराष्ट्रांस पाठविण्यालायक तयार करण्याचे सरकारी कारखाने गाझीपूर व पाटना येथे आहेत. अफू तयार करण्याचा मक्ता सरकारी आहे हे वर सांगितलेच आहे. त्याबद्दल व्यवस्था अशी आहे की, सरकारांतून जमीन करणान्यांस अफू लागवड करण्याचे परवाने देण्यांत घेतात, व तयार केलेली अफू सरकाराशिवाय दुसरे कोणास देउं नये असा त्यांत निर्वध असतो. याप्रमाणे सरकारांत आलेली अफू सरकारी कारखान्यांत तयार होते व पुढे ती कलकत्ता येथे व्यापाऱ्यांस परदेशी पाठविण्यासाठी लिलावाने विकण्यांत येते. परवान्याशिवाय वाटेल त्या इसमास अमूचे पिकाची लागवड करण्याची सक्त मनाई आहे व ती उत्पन्न करण्याचे बाबतींत, किंवा जवळ बाळगणे, किंवा विकणे, परदेशी पाठविणे, किंवा या देशांत आणणे या बाबतींत सरकारचे नियम आहेत ; व ते मोडले तर कायद्यांत एक वर्षाची कैद व हजार रुपये दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. अफूचे पिकास हवेतील फरकामुळे फार वेळी तुकसान होते व उत्पन्नही वेळोवेळी कमी जास्त होते, त्यामुळे सरकारचे उत्पन्नास पूर्व अनिश्चितपणा येते असे; परंतु गेले २५ वर्षांपासून चांगले उत्पन्नाचे साली सर्व माल न विकतां, कांहीं माल कारखान्यांत शिलक ठेवण्याची वाहेवाट सरकारांनी सुरू केली तेव्हां- पासून हा अनिश्चितपणा पुष्कळ कमी झाला. हिंदुस्थानांतून निर्मात होणारी अफ बहुतेक चीन देशास जाते व काही थोडी स्ट्रेटस् सेटलमेंटस् येथे जाते. हिंदुस्थानसरकारानी अफूचे मक्त्यांत पडणे नीतीस विरुद्ध व मादक पदार्थांचे प्रसारास उत्तेजक आहे, व औषधी कामासाठी अफू लागेल ती शिवायकरून सुखासुखी अफ खाण्याने मनुष्य नितिभ्रष्ट होऊन नुकसानीस येतो, वगैरे या व्यापाराचे संबंधाने आक्षेप घेण्यात येतात. तसेंच इंग्रज सरकारांनी चिनी लोकांस बच अफूचे व्यसन लावले आहे व सामथ्यांचे जोरावर हिंदुस्थानची अफू त्या देशावर लादण्यांत येत आहे, असाही इंग्रज सरकारावर आरोप करण्यात येतो. सन १८९३ साली विलायतेस अफूचे व्यापाराचे विरुद्ध मताची इतकी सरशी झाली की, पार्लमेंटास त्या विषयाचे संबंधाने विचार करण्यासाठी एक कमिशन नेमावे लागले. अफूची लागवड बंद करावी किंवा कसे, व बंद करणे झाले तर संस्थानांचे संबंधाने काय व्यवस्था करावी, सरकाराचे तिजोरीचें व लोकांचे किती व कसें नुकसान होईल व त्याबद्दल काय व्यवस्था करावी, अफूचे सेवनापासून परिणाम कसे होतात, व या सर्व बाबतीत हिंदुस्थानांत लोकमंत कसे आहे, या सर्व प्रश्नांचा