पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९२) अन्यायाचा यत्न रेव्हिन्यू सर्वेकडून झाला आहे, व त्याचा परिणाम खोत लोकांचे हक्क पर्यायाने काढून टाकण असा होत आहे. ही गोष्टही सभा फिरून दुसऱ्याने सरकारच्या नजरेस आणून देत आहे ; व ह्या शोचनीय स्थितीचा बंदोबस्त करण्याची तजवीज सरकाराकडून अद्याप काही झाली नाही याबद्दल सभेस खेद वाटत आहे." पोटभाग दुसरा- अफू. जमिनींचे पिकांत अफूचे पीक हे अत्यंत मौल्यवान व महत्वाचे आहे. या पदार्थाचा प्राचीन इतिहास फारसा उपलब्ध नाही, तरी साधारण असा समज आहे की पंधरावे शतकांत मुसलमानांनी इराणांतून हे झाड या देशांत आणले व प्रथमतः या झाडाची लागवड पश्चिम किनाऱ्यावर होऊन नंतर माळवा प्रां- तांत होऊ लागली. अकबर बादशहाने सरकारपरवानगीवांचून हे पीक करूं नये असें ठरविले होते. इंग्रज सरकारांनी अफूचा मक्ता सन १७७३ साली आपले- कडे ठेवण्याचे ठरविले, त्याचे पूर्वी पुष्कळ दिवसांपासून हिंदुस्थानांतून भोंवता- लचे देशांत अफू जात असे. ईस्ट इंडिया कंपनी ही पहिल्याने अफू पिकवि- ण्याचे हक्कांचा मेक्का लिलाव करून देत असे; परंतु, त्यापासून जमीन केरणारां- वर फार जुलूम होतो व अफ़्तही भेसळ करण्यांत येते असें दिसून आल्यावरून तिने सन १७९७ साली अफू तयार करण्याचे काम आपलेकडेच ठेवण्याचे सुरू केले. अफूपासून तिजोरीस उत्पन्न येते, त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार ह्मणजे हिंदुस्थानांत खपासाठी जी अफू विकली जाते तिचेवर कर घेण्यांत येतो. हे जमेचें सदर फारसे मोठे नाही व उत्पन्नाचा जमाखर्च एक्साईज (मादक पदार्थावरील कर ) या सदरांत येतो. दुसरा प्रकार ज्यापासून विशेष उत्पन्न होतें तो, ह्मणजे परदेशांत जी अफू जाते तिचेपासून उत्पन्न होतें तो आहे. अफूची लागवड माळव्यांतील संस्थानोंत व वायव्य व अयोध्या प्रांतांत व बिहार प्रांतात होते. पंजाब प्रांतांतही काही अफू स्थानिक खपासाठी उत्पन्न करण्यांत येते. माळव्यांतील अफूची लागवड संस्थानिकांचे देखरेखीखाली होते, वता अफू परराष्ट्रांत पाठविणेसाठी इंग्रजी राज्यांत आणण्यास जो परवाना