पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

0 << (१९१) कोंकणांत स्थानिक स्थितीत एकंदर सुधारणा झाली आहे अशा सबबी लावण्यां- त आल्या आहेत, परंतु त्यांचा परिणाम सदरचा नियम मोडणे हा झाला आहे. असें झाल्याने कुळांस जमिनी सुधारण्यास उमेद रहात नाही. (८) सर्व्हखात्यांतून अन्याय झाला असतां तो दुरुस्त करून घेण्यास दिवाणी कोर्टाचा मार्ग कायद्याने बंद करण्यांत आला आहे. (९) सारा वाढतो तो पहिल्याने जमिनीची प्रतवारी जास्त लावल्याने, गांवचे समुदाय पूर्वीपेक्षा लहान लहान केल्याने, व सारा घेण्याचे परमावधीचे प्रमाण वाढविल्याने असे तीन कारणांनी होतो. सन १८९४ चे प्रांतिकसभेत सर्व्हखात्याकडून होत असलेले कामाबद्दल पुढे लिहिलेला ठराव करण्यांत आला आहे. (अ) सर फिलिफ वुडहौस यांच्या कारकीर्दीत सन १८७४ साली सरकारी ठराव जमिनीवरचे सारे जबर नसावे, व त्या साऱ्यांस मर्यादा असुक प्रकारे असावी अशा अर्थाचा झाला होता; त्यानंतर लार्ड रेसाहेबांच्या कार- कीर्दीत सन १८८६ साली जमिनीत स्वखर्चानें कोणी सुधारणा केल्यास त्यावर सारा माफ असावा अशाविषयी कायद्याने हमीही दिली आहे; असे असतां स- हेंखात्याचा स्पष्ट कल याच्याविरुद्ध वागण्याचा आहे ही गोष्ट अयोग्य होय, असा या सभेचा खास अभिप्राय आहे. (ब) गेल्या पांच सालांत सदरील ठ- राव व कायदा यांच्याविरुद्ध सक्तीचा अंमल हे खाते करीत असून त्याचा स्थानिक सरकरांनी कांहींच बंदोबस्त केला नाही, उलट सर्व्हखात्याच्या अभि- प्रायाविरुद्ध सरकारी अम्मलदारांनीच खुद्द अधिक सौम्य अशा सूचना केल्या असतां त्या सरकारांनी नामंजूर केल्या आहेत, हे पाहून सभेस खेद वाटतो. (क) सर्व्हखात्याची साधने व कामाच्या पद्धति पूर्णदशेस पोंचून महागाईच्या प्रसंगों जे मुळचे दर ठरविण्यात आले होते, त्यांहून अधिक असे जमिनीचे दर ज्याअर्थी अलीकडे ठरविण्यात आले आहेत, त्याअर्थी पूर्वीच्या सुधारणेत सारे वाढवितांना जमीनकमावणीचे श्रम व स्वस्ताई ही जी दोन कारणे सरका- राने मानिली होती ती अर्थातच निरुपयोगी झाली आहेत, याकरितां विशेषतः कोंकण प्रांतांत विशेष जमिनीवर अगर गांवांच्या एकंदर जमिनीवर सारे वाढ- विण्याविषयी ज्या सूचना होत आहेत त्या सक्तीने बंद कराव्या अगर कसें, तसच वरकस जमिनीस व भातशेतांस पूर्णपणे सारे माफी देण्याच्या बाबतीत सरकारची हमी असणे अगत्याचे आहे किंवा कसे, यावद्दल सरकारांनी पूर्ण विचार करणे हे योग्य आहे. (२) देवगडतालुक्यांतील जमिनीबद्दल खुद्द खोत लोकांस जितके सारे मिळं शकतात, त्याहूनही अधिक सारे बसविण्याचा