पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९०) वसूल करणेचे मिनीच्या दिगरवाद्या होतात व जमिनी सावकाराकडे जातात. सारा वाढवि- तांना तो मितप्रमाणाने वाढविला पाहिजे. (४) सर्व्हे काम चालू असतांना त्यांत मुलकी कामगारांचा संबंध येत नाही ; तसा संबंध असणे जरूर आहे. मोजणी, प्रतवंदी, दरआकारणी, व त्याची कुळवार फाळणी, ही सर्व कामें होतपर्यंत कलेक्टर व असिस्टंट कलेक्टर यांस तें काम तपासण्याची संधी नसते. सर्व काम तयार झाल्यावर ते त्यांचे अभिप्रायासाठी जाते, परंतु तयार झालेले काम तपासून त्यांतील चुका काढण्या- स अवश्य जी फुरसत व शास्त्रीय ज्ञान लागतात ती त्यांस असत नाहीत, या- मुळे नांवाची मात्र तपासणी होते. कलेक्टर व असिस्टंट कलेक्टर यांस सर्व्हेचे कामाची माहिती करून देणे व प्रतबंदीचें व साऱ्याचे दरठरोती, काम मुलकी कामगाराचे सल्लामसलतीने होणे हे ही स्थिति सुधारण्यास उपाय आहेत. (५) पहिल्याने दर ठरवितांना सक्तीची नजर ठेवणे व तो कामांतही सक्ती करणे ह्या गोष्टी, पाऊस नियमित रीतीने पडत नाही असे भागांत फार घातुक होतात, व त्या बाबतीत थोडी जास्त सवलतीची पद्धति चालू केली पाहिजे असा शेतकीचे कायद्यासंबंधानें जें अलीकडे कमिशन बसलें होते त्यांनी अभिप्राय दिला आहे. शेतकरी वर्गाची निकृष्ट स्थिति झाली आहे व ती राज्यास भीतिदायक आहे, असें लार्ड लान्सडाउन यांनी त्या रिपोटावर मत दाखल केले आहे असें ह्मणतात. (६) साऱ्याची पद्धति मूळ ज्यानी ठरविली त्यांचा हेतु कुळांस सर्व खर्च- वेंच जाउन कांहीं रक्कम तरी शिलक रहावी असा होता; अलीकडे सारा वाढ- वितांना या तत्वाकडे दुर्लक्ष होते. सारा बसवितांना मनाचा कल कसा ठेवला पाहिजे यासंबंधाने सर जार्ज विंगेटसाहेब यांचा अभिप्राय मनन करण्यासारखा आहे. ते ह्मणतात की:-चुकून सारा जरी अतिशय कमी बसला तरी देशाचें नुकसान होत नाही, फक्त त्या मानाने सरकारास पैसा कमी वसूल होईल ; परंतु दुसरे दिशेस जर चूक झाली व सारा जरब बसला तर मात्र देशाची धुळधाण होते; तेव्हां यांपैकी कोणती चूक होऊ नये याबद्दल सावधागरी ठेवण्याची हे सांगितले पाहिजे असे नाही. (७) रयतेने केलेले सुधारणांचे कारणाने सारा वाढविण्याचा नाही असा सरकारांनी नियम केला आहे. साऱ्याचे फेरतपासणीचे वेळी या नियमाकडे दुर्लक्ष होते. या प्रकारचे दुर्लक्ष गुजराथ व कोंकणांतील सर्व्हेचे वेळी विशेष झाले आहे. सारा वाढवितांना गुजराथेंत जमिनीखाली पाणी जवळ आहे व