पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९) मद्रासइलाख्यांतही सारा दरसाल पालटण्यांत येत असलेमुळे रयतेची स्थिति वाईट आहे व यांचीही दुष्काळाचे वेळी तशीच स्थिति झाली होती. यावरून रयतवारी पद्धति चालू आहे असे भागांत रयतेची स्थिति, कायमचा सारा असतो असे भागांतले रयतेपेक्षां वाईट असते, असें या बाजूचे ह्मणणे आहे. ह्या गोष्टीचे ते सरकारी दाखल्यावरून समर्थन करून दाखवितात. प्रजापक्षाचे लोकांस व कांहीं सरकारी कामगार यांस कायमची दरठरोती पसंत वाटते व तिजपासून ते पुढील फायदे दाखवितात. (१) वेळोवेळी साऱ्या- ची तपासणी करण्यासाठी लागणारा खर्च वाचेल. (२) त्या तपासणीचे वेळी लोकांस जो त्रास होतो तो होणार नाही. (३) साऱ्याचे ठरावाची मुदत सर- ण्याचे सुमारास मिळकतीची किंमत कमी होते ती होणार नाही. (४) जमि- नीत सुधारणा होईल व तिजवर भांडवल खर्च होईल व त्यापासून देशाची सुब- त्ता होईल. (५) लोकांत समाधान व संतोषवृत्ति असल्याने जमिनीची किंमत वाढेल. येथपर्यंत सर्व हिंदुस्थानचा सामान्य विचार झाला. प्रत्येक प्रांतांत सव्हेंचे व दरठरोतांचे पद्धतीत दोष असतीलच व नियम अमलांत आणण्याचे संबंधानेही पुष्कळ तकरारी करण्यासारख्या गोष्टी घडत असतील, परंतु त्यांच्या संबंधाने माहिती लागणेही कठीण व मिळाली तरी ती असे सामान्य वर्णनात्मक पुस्तकां- त देणेही शक्य नाही. मुंबईइलाख्यांतील सर्व्हचे संबंधाने काही तकरारी आहेत त्यांचे टिपण,त्या विषयाचा पूर्ण विचार केला आहे असे एका सद्गृहस्थाने, हा ग्रंथ लिहिणाराचे विनंतीवरून दिले आहे; त्यांतील काही महत्वाचे मुद्दे पुढे दिले आहेत; ते सर्व आतिशय महत्वाचे आहेत, तेव्हां त्यांचेबद्दल कोणाचे मत भिन्न होण्याचा संभव असला तरी, सर्वांनी त्यांचेबद्दल विचार करून अनुभव घेऊन पाहण्यासारखे ते मुद्दे आहेत:- (१) वाढलेले साऱ्याचे दर कायम करण्यापूर्वी जमीन धारण करणारे लोकांचे ह्मणणे ऐकून व्यावे असा सरकारचा नियम आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होतांना या लोकांस आपलें ह्मणणे कळविण्यास योग्य अशा सवलती देण्यांत येत नाहीत. (२) सारा वाढवितांना तालुक्याचा व खेड्यांचे समुदायांचा सारा पूर्वीपेक्षा शेकडा ३३ टक्यांपेक्षा जास्त वाढवू नये, संबंध एका गांवचा सारा ६६ टक्यांपेक्षा जास्त व कुळवार सारा दुप्पटीवर जाऊ देऊ नये; ह्या ज्या मर्यादा सरकाराने ठरविल्या आहेत त्या फार प्रसंगों मोडल्या जातात. (३) सारा जास्त वाढल्याने तो कुळांच्याने देववत नाही व त्या कारणाने ज-