पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८८) मिळतो हे एक मुख्य आहे. खरोखरी अशी स्थिति नाही. तसें विधान कर- तांना जमिनीचे मालक पूर्वीचेच आहेत, त्यांस जमिनी मुफत मिळाल्या आहेत, असे गृहीत घेण्यांत येते, परंतु पूर्वी ज्यांचेबरोबर ठराव झाले त्याच जमीन- दारांकडे जमिनी आहेत असे फारे क्वचित आहे ; बहुतेक जमीनदान्या पूर्वीचे मालकांकडून दुसरे मालकांकडे गेल्या आहेत व त्यांस पुरी किंमत द्यावी लागली आहे. जमिनीस किंमत पडते ती तिचेवरील स्वत्वाचे व तिचेपासून होणारे किफायतीचे मानाने पडते; व जे जमिनीचे मालक झाले आहेत त्यांनी ज्या- अर्थी पुरी किंमत देऊन जमिनी घेतल्या आहेत, त्याअर्थी त्यांस येणारा फा- यदा बिनमोबदल्याचा व मुफत आहे असें ह्मणतां येणार नाही. जमीनदारांस मूळ जमिनी मुफत मिळाल्या असेंही झालेले नाहीं; कारण कायमचे साऱ्याचे ठराव झाले त्या वेळी फार जमीन पड होती, व तीत जंगल वाढलेले होते; त्या सर्व जमिनी त्या लोकांस कायमचें स्वत्व मिळाल्याने त्यांनी खर्च करून जंगल तोडून लागवडीस आणल्या आहेत. मूळ जमिनी लागवडीस आणण्यास मूळचे जमीनदारांस पुष्कळ खर्च करावा लागेला व हल्लींचे जमीनदारांस उत्प- नोचे मानाने किंमत द्यावी लागली आहे; तेव्हां जमिनीपासून येणारा फायदा मुफत मिळतो असें ह्मणतां येत नाही. मुंबई इलाखा इंग्रजांचे ताब्यात आल्यावर पहिल्याने सारा अतिशय बसवि- ण्यांत आल्याने रयतेची दैना झाली. पुढे त्याबद्दल सरकारांत दाद लागून सारा वेताचा बसला. त्यानंतर अमेरिकेंतील लढाईमुळे, शेतकीचे मालास किंमत आली होती, व शेतकीस तेजी आली होती, त्याच सुमारास साऱ्याची फेरतपासणी झाल्याने त्या वाढलेल्या किमतीचे मानाने सारे बसले; काय कारणाने किमती वाढलेल्या आहेत याबदल विचार झाला नाही. जोपर्यंत ती तूर्तातूर्त आलेली सुस्थिति चालू होती तोपर्यंत ठीक चाललें, परंतु पुढे लढाई बंद झाल्यावर त्या कारणाने ज्या किमती वाढल्या होत्या त्या कमी झाल्या व शेतकरी लोकांचे हालास सुरवात झाली. काही दिवस सारा शिलकेंतून दिला व ती सरल्यावर सावकाराची मदत लागू लागली. अखेरीस सावकाराचा त्रास असह्य झाल्यावर दंग्यावर आले. याप्रमाणे रयतेजवळ सारा भागून भांडवल शिलक रहात नसले मुळे दुष्काळराजाची स्वारी येतांच त्यांची स्थिति अत्यंत वाईट झाली; कारण त्यापासून संरक्षण करण्याची साधनेंच त्यांचेजवळ नव्हती. वायव्यप्रांतांतही पूर्वी दरसाल सारा ठरेतोपर्यंत स्थिति वाईट होती. पुढे तीस वर्षांचे मुदतीने सारा ठरविण्यात आल्याने ती पूर्वीपेक्षां सुधारली असें अ- नुभवास आले आहे.