पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८७) या मतवाद्यांचे विचार व विरुद्ध मताचे लोकांचे विचार यांत अंतर पडण्याचे कारण असे आहे की, ते वेगळाले तत्वांस जास्त महत्व देतात. कायमचा सारा असा- वा असे मानणाऱ्या पक्षाचे लोक असें ह्मणतात की, साऱ्यांत वारंवार पालट झाला तर लोकांस जमिनीत भांडवल घालून ती चांगले स्थितीत आणण्यास धैर्य व इच्छा होत नाही व यामुळे शेतकीची स्थिति वाईट राहते. विरुद्ध बाजूचे असें ह्मणणे आहे की, कालेंकरून शेतकीची व इतर सुधारणा झाल्याने सारा जास्त वाढवून उत्पन्न वाढविण्यास सांपडते ती संधी नाहीशी होईल. एक वर्ग देशाचे अवादीकडे लक्ष ठेवतो व दुसरा वर्ग सरकारी उत्पन्न कसे वाढेल यावर नजर देतो. कायमचा सारा करण्याचे बाबतींत पूर्वी हुकूम झाले त्या वेळीही खाज- न्याचे काही नुकसान होईल की काय या गोष्टीचा विचार झालाच होता व ते हुकूम देणारांनी साऱ्यापासून नुकसान होईल त्याच्या मोबदला देशाची जी अ- वादी होईल ती धरली होती. याप्रमाणे या दोन मतवादी लोकांचे विचारांची सरणी आहे. सरकारांनी सारा कायमचा करण्याचा नाही असे ठरविल्याचे वर सांगितलेंच आहे व त्यापूर्वीचे वादविवादाचा सारांशही दिला आहे. आतां कायमचा सारा हवा असें ह्मणणारांचे विचार देण्याचे आहेत. त्यांचे ह्मणणे असें आहे की, कायमचे साऱ्याची, मुदतीचे साऱ्याची व दरसाल साऱ्याचा ठराव होण्याची, अशा तिन्ही पद्धति अनुक्रमें बंगाल प्रांतांत, वायव्य प्रांतांत व मुंबई इलाख्यांत व मद्रास इलाख्यांत चालू आहेत. प्रांतांतील स्थिति पाहिली ह्मणजे बंगाल्याची स्थिति उत्तम, दुसरे वर्गाचे प्रांतांची स्थिति मध्यम व दरसाल सारा ठरत अ- सलेले प्रांतांची स्थिति कनिष्ट अशी आहे. बंगाल्यांत पहिल्याने दोनतृतीयांश जमीन जंगल होती व त्यांत वनपशुंचेच वास्तव्य असे, व ती जमीन लागवडीस आणण्यास थोडे मुदतीचे ठरावाने लोकांस इच्छा होणार नाही, या गोष्टीचा वि- चार करूनच लार्ड कार्नवालिस यांनी साऱ्याचा कायमचा ठराव केला. त्याचा परिणाम असा झाला आहे की बंगाल्यांतील शेतकी उत्कृष्ठ स्थितींत आली आहे, व सरकारचा सारा अतिनियमितपणाने व कमी खर्चाने वसूल होत आहे. अ- सेच प्रकाराने स्थित्यंतर झाल्याबद्दल व सद्यःस्थिति फार चांगली असल्याबद्दल त्या प्रांतांचे लेफ्टनेंट गव्हरनरांनी अभिप्राय दाखल केले आहेत ; व त्या प्रांतां- तील लोकांस दुष्काळासारखे प्रसंग इतर प्रांतांतील लोकांपेक्षा कमी त्रासाने सोसतां येतात असेंही पण सदरचे अंमलदारांनी कबूल केले आहे. कायमचा धारा ठरविण्याविरुद्ध जी कारणे देण्यात येतात त्यांत देशसुधार- णेमुळे जमिनीपासून जो जास्त फायदा येतो तो जमीनदार लोकांस मुफत