पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८६) स्वाभाविक आहे तेही प्रयत्न करतील, व अखेरीस इतर कर कमी झाल ह्मणज जमिनीवरील बोजे वाढतील व त्याचा जमीन करणारे रयतेचे स्थितीवर परिणाम चमत्कारिक होईल; यासाठी सरकारांनी आपण जमिनीचे मालक आहों ही वि- चारसरणी सोडून द्यावी. सरकारांस वाटेल तितका सारा वाढविण्याचा अधिकार आहे ऐशी याचे तत्वाचा परिणाम फेरतपासणीचे वेळेस सारा जो सत्तर किंवा टक्केपर्यंत वाढविण्यांत येतो हा असावा. सरकारांनी आपण उत्पन्नाचा कितवा हिस्सा घेण्याचा ते कायमचे ठरवून टाकावे किंवा एकंदरीत जास्तीत जास्ती ह्मणजे किती सारा बसविण्याचा ते ठरवावें. सरकारच जमिनीचे मालक असले ह्मणजे लोकवस्ती एके ठिकाणींच वाढत जाते व त्यावर सरकारी देणेही जास्त पडते. जमिनीवर खासगी इसमाची मालकी असली झणजे तो आपली सोय पाहतो व त्यामुळे लोकांस जमीन मिळत नाहीशी झाली ह्मणजे उदरनिर्वाहा- साठी त्यांस दुसरीकडे जावे लागते व त्यामुळे लोकवस्ती एकेच ठिकाणी वाढत राहत नाही. शिवाय दुसरी गोष्ट ह्मणजे की खासगी इसमास जो ऐवज येतो त्यापैकी काही भाग तरी जमीन सुधारण्याकडे लागतो; तसें सरकार मा- लक असलें ह्मणजे होत नाही, व लोकांस सर्व बाबतींत सरकारावर अवलंबून रहाण्याची संवय लागते, त्यांच्यांत स्वावलंबन रहात नाही. हल्लींचे स्थितीत जमिनीपासून व्हावे तसें पीक होत नाही. सारा वारंवार वाढणे, शेतकरी लो- कांची निकृष्ट स्थिति असणे, शेतकीत सुधारणा न होणे व जमिनीची मशागत न होणे, व लोकसंख्या वाढत जाऊन उत्पन्न सर्व खाण्यांत जाऊन धान्यसंग्रह न होणे ही हल्लींचे निकृष्ट स्थितीची कारणे आहेत. ही स्थिति सुधारण्यास उपाय सुचविण्यात आले आहेत ते सरकारांनी आपण घेण्याचा भाग नियमित करून टाकून वाटेल तितका सारा वाढविण्याचा हक्क आहे हे तत्व सोडून यावें; सावकारापासून रयतेस जो त्रास होतो त्यापासून त्यांची सोडवणूक करे- ण्यासाठी शेतकऱ्यांच्या पेढ्या काढाव्या; बागाईत वाढून जमिनीत जास्त उत्पन्न होईल असें करावें; सरकारचे सायबलद्द ऐवज एकदम देऊन टाकून तो जमि- नीवरील बोजा कायमचा दूर करण्यास सवड ठेवावी, असे केल्याने इनामदारां- सारखा एक नवा वर्ग उत्पन्न होईल व मालकी कायमची झाली असतां शेतीची सुधारणा करण्यास त्यांस उत्तेजन येईल. याप्रमाणे सरकारी पद्धतीसंबंधानें लो- कांचे विचार आहेत. कायमचा सारा करण्यासंबंधाने हिंदुस्थान व विलायतसरकार यांचे दरम्यान झालेले वादविवादाचा सारांश दिलाच आहे; आतां कायम सारा व्हावा या मताचे जे लोक आहेत त्यांचे विचाराचा थोडक्यांत सारांश दाखल करण्याचा आहे. .