पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८१) जमीन लागण झाली तर तिचेपासून सरकारास फायदा फेरसर्व्ह झाल्यावर होतो. तसेंच मुंबई व मद्रास इलाख्यांत साऱ्याचा ठराव शेतावर असल्यामुळे ती शेतें कुळांस पाहिजेल तेव्हां सोडून देतां येतात. तसें उत्तरहिंदुस्थानांतील पद्धतीप्रमाणे करता येत नाही ; कारण तेथें सारा गांववार ठरलेला असतो व लागवडीसंबंधानें कसाही फरक झाला तरी ठरीव सारा त्या गांवांत पुरा करून द्यावा लागतोच. साऱ्याचा वसूल हतयांनी करण्यांत येतो. त्यांच्या सुदती वेगळाले प्रांतांत वेगळाल्या आहेत. पावसाची कमतरता झाल्याने पीक झाले नाही किंवा दुसरे कारणामुळे पिकाचे नुकसान झाले तर सारा घेण्याचे तहकूब करण्यांत येतें. तो माफ करण्याचा किंवा कसें तें पुढील पीक कसे येते ते पाहून प्रत्येक प्रसंगी ठरविण्याचे आहे, असा उत्तहिंदुस्थानांत नियम अलीकडे करण्यात आला आहे. तशी तहकुवी व माफी देण्याची वहिवाट दक्षिण व पश्चिम हिंदुस्थानांत साऱ्याचे पद्धतीचेच अंगभूत आहे. हिंदुस्थान हा प्राधान्य करून शेतकरी देश आहे हे आरंभीच सांगण्यांत आले. लार्ड मेयो यांनी असें ह्मटले आहे की “ या देशाचे सुधारणेत व संप- त्तिवर्धनाचे कामी पाउल पुढे पडणे आणखी काही शतकें तरी शेतकीचे सुधा- रणेवर व विस्तारावर अवलंबून राहील; पुष्कळ काळपर्यंत शेतकीचे उत्पन्न हेच निर्यात मालाचा मुख्य भाग राहील; व्यापार सुधारण्यास हल्लींचे धान्यांचे व उत्पन्नाचे मानांत व गुणांत सुधारणा झाली पाहिजे किंवा व्यापारोपयोगी अथ- वा कालोपयोगी होण्यासारखे पदार्थ या देशांत नवीन उत्पन्न करूं लागले पाहिजे. शेतकीशी इतका निकट संबंध दुसरे कोणतेही सरकारचा नाही; हिंदुस्थानसर- कार हे नुसते राज्यशास्ते आहेत इतकंच नाही, तर ते मोठे जमीनदारही आहेत. जमीन सुधारण्याचे प्रत्येक बाबीने सरकारचे मिळकतीची किंमत वाढत जाते वगैरे." यासाठी या देशांत शेतकीचे प्रश्नाचे विशेष आस्थेनें परिशीलन व्हावें ह्मणुन सन १८७० साली हिंदुस्थानसरकारांनी शेतकीचे खाते वेगळे स्थापन केले व त्याप्रमाणे पुढे प्रांतांतूनही तें खाते काढण्यात आले आहे. हल्ली फेर- मोजणीच्या बाबतीत ज्या सुधारणा झाल्या आहेत त्यांचे श्रेय या खात्याकडेच आहे. या खात्याकडून आतां गांवचे कागद व नकाशे बरोबर ठेवण्यात येतात, व भाज्याचेबद्दल योग्य दाखले वेळचेवेळेस ठेवण्यांत येतात. याप्रमाणे माहिती बरोबर असली झणजे तपासणीचे वेळी मोजणी करण्याचे कारण राहत नाही. जमीनवावीचे उत्पन्नाची वाढ. या बाबीचे उत्पन्न सन १८४० सालापासून आतांपयर्त दुप्पट वाढले आहे हे पुढील आंकड्यांवरून दिसून येईल.