पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८०) येत नाही. त्यानंतर साऱ्याची फेरतपासणी करण्यांत येते. फेरतपासणी कर- तांना मागील सर्व्ह झाल्यापासून कोणते प्रकारचा पालट झाला असेल, त्याचा विचार करण्यांत येतो. जमीन धारण करणाराने आपले खर्चाने सुधारणा केल्या असतील तर त्यांबद्दल सारा वाढविण्यांत येत नाही; आणि ज्या तीन कारणां- साठी सारा वाढविण्यांत येतो ती वर दिलीच आहेत. त्या नियमांचा अंमल करतांना कोणती सर्व्ह आधारास घेण्याची हा प्रश्न येतोच. त्यासंबंधाने असें ठरले आहे की, ज्या ठिकाणी पूर्वीची सर्व्ह बरोबर व उभय पक्षांस सोईची झालेली असेल तेथें फिरून मोजणी करण्याची जरूर नाही, परंतु तशी स्थिति नसली ह्मणजे मोजणीपासून फिरून सर्व काम व्हावें. एकदा मोजणी व प्रतवंदी बरोबर झाली असली झणजे पुढे तिचे अनुरोधानें गांवचे कागदपत्र वरोबर चालू ठेवणे हेच महत्वाचे काम रहाते. हे हक्काचे दाखले वगळाले प्रांतांत कसे ठेवण्यांत येतात, व ते बरोबर ठेवले जाण्यासंबंधाने अलीकडे काय नवीन व्यवस्था करण्यांत आली आहे ते सांगून हे पद्धतीचे वर्णनाचे प्रकरण पुरे करण्याचे आहे. या संबंधाचा मुख्य दाखला ह्मणजे जमिनींचा नकाशा व त्यांचें रजिस्टर. नकाशांत शेताचे क्षेत्र व त्याचे ठिकाण व त्याचा नंबर दाखविला असतो. रजि- स्टरांतही क्षेत्र व ती जमीन बागाइती किंवा जिराइती आहे, हे दाखल असून शिवाय दुसऱ्याही गोष्टी असतात. या गोष्टींचा पर्याय प्रांताप्रांतांत वेगळाला आहे. मुंबई व मद्रासेत जमीन धारण करणारे इसमाचें नांव दाखल करण्यांत येऊन इतर हक्कदारांचे हक्काचा निर्णय करण्याचे काम दिवाणी कोटांवर सोप- विलेले असते. वायव्च प्रांतांत ते काम तें रजिस्टर तयार करणारा अंमलदारच करतो. त्याचे ठरावास नाराजी झालेले इसमास दिवाणी मार्ग खुला असतो.उत्तरहिंदु- स्थानचे इतर भागांत ह्या ठरावांवर दिवाणी दावा चालत नाही. गांववार किंवा इस्टेटीवार ठराव झाले असतील असे प्रसंगी या रजिस्टराशिवाय कुळे, व त्यांचे. कडे असलेल्या जमिनी, व तसेंच त्या जमिनींचे मालक, व त्यांचे हिस्से व त्यांची समुच्चयाने किंवा वेगळाली असलेली सारा देण्याची जबाबदारी, यांबद्दल दाखला ठेवण्यांत येतो. पडजमीन लागवडीस देण्यासंबंधाने थोडे सांगण्यासारखे आहे ते असे की, मद्रास व मुंबई या इलाख्यांतील सव्हेंचे पद्धतीप्रमाणे सर्व जमीन, ती लागण झालेली असो किंवा पड असो, ती मोजली जाऊन तिजवरील सारा ठरलेला अ- सतो; ती जमीन लागणसि घेतली की लागलीच तिजबद्दलचा सारा सुरू होतो. उत्तरहिंदुस्थानांत साऱ्याचा ठराव गांवांबरोबर असतो, तेव्हां पड