पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७८) आहे तोपर्यंत जमीन काढून घेण्याची नाही, व कुळांस जमीन काढून घे. ण्याचे वेळी त्यांनी सुधारणा केली असेल त्याबद्दल नुकसानी द्यावी असें ठर- लेलें आहे. मध्यप्रांतांत धारा ठरविण्याचे पद्धतीचा पाया जरी वायव्य प्रांतांतील पद्धतीवर आहे तरी त्यांत स्थानिक कारणांनी फरक पुष्कळ झाले आहेत. मोजणी व पहाणी वायव्य प्रांतांतील नमुन्यावरच होते, व त्याच प्रांतांतले- प्रमाणे भाड्याचा किंवा नफ्याचा निमे भाग सरकारांत घेण्यांत येतो. या प्रांतांत जमीन धारण करण्याची पद्धत बंगाल, मुंबई, उत्तरहिंदुस्थान यांत चालू असलेपैकी पूर्णपणे अशी एकहीं नाहीं; तींत जमीनदारी, मौजेवारी, रयत- वारी या तीनही पद्धतींचे प्रकार आहेत. त्या पद्धतीस चांगलें अर्थबोधक नांव ह्मणजे मालगुजारी पद्धत हेच आहे. मालगुजार ह्मणजे पूर्वी ज्यांचे गुजारतीने वसूल होत असे ते लोक व त्यांचेचबरोवर इंग्रज सरकारांनी धा- याचा ठराव केला आहे. पुष्कळ जमिनींचे मालक व ज्यांत वडील घरांतच पुरुष संततीस वारसा जातो, असे काही खरे जमीनदार या प्रांतांत आहेत. या जमीनदारांपैकी काही पूर्वी सरकारदेण्याचे ठेकेदार व कांहीं गांवचे मुख्य होते, व त्यांचेबरोबरच ठराव झाले त्या वेळी त्यांस जमिनीवर मालकी हक्क प्राप्त झाले. पंजाब व वायव्य प्रांतांप्रमाणे ग्रामपद्धति जेथें चालू आहे, तेथें गांवचा मुख्य, व त्या गांवचे इतर जमिनीचे मालक यांचे संबंध, त्या प्रांतांतील जमीनदारी किंवा पट्टीदारी पद्धतीप्रमाणे असतो.. बरेच मालगुजार हे स्वतंत्र जमिनीचे मालक असून त्यांचा व जमीन करणारांचा संबंध कायद्या. वरून ठरलेला आहे. या प्रांतांतील स] पद्धतीचा कल पोटहिस्सेदारांचे हक कायम करण्याकडे फार आहे. असे प्रकाराने ज्या पोटहिस्से दारांचे हक्क ठरविण्यात आले आहेत ते व ज्यांचेबरोवर मालकी देण्याबद्दल ठराव करण्यांत आले नाहीत असे लोक व ज्या इनाम जमीनी खालसा झाल्या त्या करणारे लोक यांस कमी दर्जाचे जमिनीचे मालक या सदरांत गणण्यांत येते; व सारा मालगुजारांचे मार्फतीने भरतात. संबलपूर जिल्ह्यांत मात्र रयत- वारी पद्धतीशी अगदी साम्य असणारी पद्धत लागू झाली आहे. याप्रमाणे या प्रांतांत जमीनदारी, मौजेवारी व रयतवारी या तीनही पद्धति अंशतः चालू आहेत. आसाम प्रांतांत सर्वत्र धाऱ्याची सारखी पद्धति चालू नाही. त्या प्रांताचे वेगळाले भागांत सुधारणा कमी जास्ती प्रमाणाने झालेली आहे ; त्याच अनुरो- धाने साऱ्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न आहेत. ब्रह्मपुत्रानदीच्या खोऱ्याचे भागांत