पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७७ ) जमीन सोडणारांचे बरोबर गांवची जमीन करणारे जे लोक असतात त्यांस ती जमीन मिळण्याचा प्रथम हक्क असतो. अयोध्या प्रांत सन १८५६ साली खालसा झाला. या प्रांतांतील तालुक- दार हे बंगाल्यांतील जमीनदारांप्रमाणे नुस्ते सायचे मक्तेदार असे नव्हते. ते मुळचे त्या प्रांतांतील बडे लोकांपैकी होते व त्यांचा जमिनीवरील अधि- कार वंशपरंपरेने किंवा लष्करी हुद्याचे कारणाने आलेला असा होता. या तालुकदारांचे ताव्यांतील जमिनींचे साऱ्याचा ठराव त्यांचेवरोवरच करण्यांत आला व इतर जमीनीसंबंधाने जमिनींचे मालकांबरोबर वर सांगितलेले पद्धतीप्रमाणे ठरविण्यांत आला. तालुकदारांशी ठराव होतांना तीन वेळां तीन प्रकार झाले व त्याचा परि- णाम जमीन करणारे कुळांस अनिष्ट असा झाला. हा प्रांत खालसा झाल्यावर तालुकदार जरी हक्कदार होते व त्यांचा हक्क कवूल करणे जरी रास्त होते, तरी ते हक्क पहिले सव्हेंचे वेळी पाळण्यात आले नाहीत. त्यामुळे तालुक- दार विथरून जाऊन सन १८५७ साली बंडांत सामील झाले. त्यानंतर लार्ड क्यानिंग साहेबांनी सर्व जमीनदार लोकांचे हक्क रद्द आहेत असा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तो प्रसिद्ध करण्याचा हेतु असा होता की पूर्वीचे सव्र्हेनें उत्पन्न केलेले अयोग्य हक्क नाहीसे व्हावे व तालुकदारांस पूर्वीचे हेक्कांप्रमाणे जमीन देण्यास सांपडावी. हा हेतु सिद्धीस गेला, परंतु एकंदरीचे लाटांबरोबर रयतेचा हक मात्र नाहीसा झाला. बंडानंतर कायमची दरठरोती करावी या मताचें प्रावल्य होते, व त्या अवधीत तालुकदारांबरोबर बंडाचे पूर्वी, त्यांचे ताब्यांत ज्या जमिनी असतील, त्यांबद्दल उक्ता सारा द्यावा असा ठराव करण्यांत आला. शिवाय त्या तालुकदारांत वडील मुलासच वारसा चालावा असें ठरविण्यांत आले, व त्यांस मृत्युपत्र करण्याचा आधिकार, पूर्वी नसलेला, देण्यात आला. परंतु त्या वेळी कुळांचे हक्कांचा काही विचार झाला नाही, तर तालुकदारांचे विरुद्ध त्यांचे हक्क चालू देण्याचे नाहीत असेंच ठरविले होते. याप्रमाणे या प्रांतांतील दोनतृतीयांश जमीन तालुकदारांकडे आहे, व एकतृतीयांश जमीन लहान कुळे किंवा प्राचीन ग्रामव्यवस्थेप्रमाणे रहाणारे लोक यांचेकडे राहिली आहे. अलीकडे कुळांची स्थिति सुधारण्यासाठी सन १८८६ साली कायदा झाला आहे, व त्याप्रमाणे भाडे वाढविणेचे व जमिनी काढून घेणेचे बाबतींत मह- त्वाचे नियम ठरविले आहेत. हल्ली असलेले कुळांवर वसलेला सारा वाढविणे तो ६३ टक्यांपेक्षा जास्त वाढविण्याचा नाही, व सारा बरोबर देण्यांत येत. १२