पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७६) ठिकाणी करून ते मालक मंडळीत वांटून घेण्यांत येते असे. (२) पट्टीदारी रीतीचे, ह्मणजे ज्यांत गांवची जमीन मालक वेगळाले लावतात व आपला साऱ्याचा हिस्सा देतात ते. या वर्गात एखादे इसमाचा सारा थकला तर त्या- बद्दल जब बदारी मात्र सर्वांवर असते. (३) तिसरे प्रकारांत जमीनदारीचें व पट्टीदारीचे संमेलन झालेले असते, ह्मणजे कांहीं जमीन समाईक ठेवलेली असते व कांहीं वांटलेली असते. याप्रमाणे समाईक ठेवलेले जमिनींचे उत्पन्नां- तून सारा पहिल्याने देण्यांत येतो व नंतर शिलक राहील तें वांटून घेण्यांत येते. यांत गांवावरचे मालकीतील हिश्शाप्रमाणे प्रत्येक प्रकारचे जमिनीत हिस्सा असतो (४) चवथा प्रकार भायाचारी. हा प्रकार साधारण तिसरे प्रकाराप्र. माणेच असतो; फरक एवढाच की प्रत्येक प्रकारची जमीन हिश्शाचे हक्काचे मा- नानें इसमवार घेतलेली नसते. हिस्सा वहिवाटीप्रमाणे ठरतो, वंशपरंपरेचे हक्काप्रमाणे ठरत नाही. असे प्रकारचे गांवाबद्दल सान्याचे ठराव सरकार जमीनदारांच प्रतिनिधि-लंबरदार-ह्मणून असतात त्यांचेबरोबर करतात. या प्रांतांतील मोजणीची पद्धति दक्षिणेकडील प्रांतांतील पद्धतीपेक्षा जास्त व्यापक आहे. तिकडचेप्रमाणे जमिनीची मोजणी व प्रतबंदी होतेच, परंतु याशिवाय प्रत्येक गांवांतील वहिवाटी, व पोटकुळांच्या जमीन धारण करण्या- च्या पद्धति, यांची चौकशी करून नोंद ठेवण्यांत येते. यापासून सरकारदेणे निश्चित होतें इतकेंच नाही, तर जमीन करणारे सर्व वर्गाचे परस्पर हक्कसंबंधही निश्चित होतात. पंजाबप्रांतांतील जमीन स्वतः कसणारे कुळांचे ताव्यांत विशेष प्रकाराने अ- सलेमुळे तेथील सारा जमिनींचे पिकाचे मानाने ठरविण्यांत येतो. वेगळाले प्रकारचे जमिनीत, एक प्रकारचे पीक घेऊन ते किती होतें तें पहातात ; ही माहिती पुष्कळ वर्षांची घेण्यांत येते व त्यांत बरे व वाईट सालांची सरासरी आल्याने उत्पन्नाचें मध्यम प्रमाण चांगले निघते. असे प्रकाराने उत्पन्न जे ठरेल त्यापैकी सहावा हिस्सा सरकारांत घेण्यात येतो. ही आकारणी पाहिल्याने कांहीं गांवांचे समुदायाची एके ठिकाणी काढून नंतर तो आकार गांववार वाद- ण्यांत येतो. गांवांत जमीनवार फाळणी करण्याचे काम गांवकीवर सोंपावलेले असतें. वायव्य प्रांतांतील जमीन धारण करणारांचे वर्ग सांगितले आहेत त्यांपैकी पहिल्या वर्गाचे लोक पंजाबांत फारसे नाहीत. पट्टीदारी व भायाचारी वर्ग सांगितले आहेत त्याच वर्गाचे बहुतेक लोक आहेत. सरकारदेण्याबद्दल सर्व गांवकीच लोक जबाबदार असतात व एखादे इसमाने जमीन सोडली तर, त्या