पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७५) . त्याचा या दुसरे प्रकारचे गांव आहेत त्यांत गांवांतील जमीन वांटून घेतलेली असते व जमिनीचे मालक आपापल्या जमिनींबद्दल सान्याचा अंश गांवकीस देतात ; व याप्रमाणे गांवकीची समाईक व्यवस्था सोडून जमिनी वांटून घे- ण्याकडे लोकांचा कल जास्त होत चालला आहे. पंजाब प्रांतांत जमिनीचे मालकच बहुतकरून जमीन करतात, परंतु वायव्य प्रांतांत बऱ्याच जमिनींचे मालक त्यांची लागवड कुळांकडून करवितात. या कुळांत हक्कदार व उपरी असे दोन वर्ग आहेत. पहिले वर्गाची ह्मणजे हक्कदार कुळाची जमीन तो सारा बरे वर रीतीने देत आहे तोपर्यंत त्याचेकडून निघण्याची नसते व हक्क त्याचे वारसाकडे जातो. या कुळांनी देण्याचा धारा रूढीप्रमाणे ठरलेला असतो व तो कांहींचा कायम ठरलेला असतो व कांहींचा विवक्षित कारणासाठी मात्र वाढवितां येतो. कुळांस काढून टाकण्यास दिवाणी हुकुमनामा मिळवावा लागतो व तो मिळविण्यास सारा वरोवर रीतीने दिला जात ना. असें शाबीत करावें लागते. या प्रांतांतील शंभरांपैकी सत्तर हिस्से जमीन मूळ मालक किंवा हक्क- दार कुळे यांचेकडे लागवडीस आहे. दुसरे प्रकारचे कुळांस साल- अखेरीस काढून टाकता येते, व त्यांनी देण्याचा धारा त्यांच व मालकाचे वि- चाराने ठरण्याचा असतो. कुळांनी जमिनीत सुधारणा केली असल्यास त्यांस काढून टाकतांना त्याबद्दल त्यांस नुकसान भरून द्यावे लागते. सारा बसविण्याचे कामांत पहिल्याने जमिनीची मोजणी होते व त्यानंतर सारा बसविण्याचा असेल त्या जिल्ह्याचे देशस्थितीचे मानानें भाग पाडण्यांत येतात. त्यापुढील व सर्वांत महत्वाचे काम ह्मटले ह्मणजे जमिनीपासून भाडे किती येते, किंवा नक्की नफा किती रहातो, ते पहाण्याचे असते. मद्रासेस ज्याप्रमाणे सारा जमिनीचे उत्पन्नावर किंवा मुंबईत पूर्वीचे सान्याचे मानावर ठरावण्यांत येतो त्याप्रमाणे उत्तरहिंदुस्थानांत तो जमिनीचे भाड्याचे किंवा नफ्याचे मानावर ठरविण्यांत येतो. याप्रमाणे भागवार भाड्याचा आकार ठरवि- ण्यांत येतो, व नंतर तो गांववार वांटण्यांत येतो. साऱ्याची वाटणी करणे ती जमिनीचे मगदुराचे मानाने किंवा त्या जमिनीस कृत्रिम सोईची अनुकूलता असेल त्या मानानें तो वांटण्यांत येतो. भाडे किंवा नफा जो हिशेवाने निघेल त्यापैकी निम्मे सरकारांत घेण्याचा असें ठरलेलें आहे. हे ठराव ३० वर्षांचे मुदतीचे असतात. वायव्य प्रांतांत जमीन धारण कर- णारे जमीनदार मुख्यत्वे चार प्रकारचे आहेत. (१) जमीनदारी रीतीचे, ह्म- णजे ज्यांत गांवच्या सर्व जमिनी एकत्रांत वहिवाटून व त्यांचे सर्व उत्पन्न ऐके