पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साऱ्याची फेरतपासणी आहत. वाटीचा अवशेष हल्लींची मेहवासी पद्धति आहे. कुलाबा व रत्नागिरी (१७३) मेहवासी लोक पूर्वी फक्त काही खंडणीदाखल रक्कम देत व त्याच वहि जिल्ह्यांत खोतीची पद्धत आहे. बंगाल्यांतील जमीनदारांप्रमाणेच हे पहि- ल्याने सान्याचे मक्तेदार होते व पुढे ते मालक असे ठरलेले आहेत. गांवचे सर्व सान्याबद्दल जबाबदार खोत असतो. अलीकडे काही नवीन ठराव करून खोती गांवांतील कुळांस कांहीं हक्क दिले आहेत. झाल्यावर तो देण्यास ते खोत जबाबदार असतात. इनामांत चार प्रकार (१) मुसलमानांनी दिलेल्या जहागिरी व मराठ्यांनी कामगिरीबद्दल वक्षिस दिलेली इनामें किंवा सरंजाम किंवा नेमणुका. (२) नौकरांची इनामें. (३) देवस्थानांची इनामें. (४) जातइनामें. या वर्गाची इनामें साधार- णतः बिनशर्तीने वंशपरंपरेने दिलेली आहेत. या इनामांबद्दल एक कमिटी नेमून चौकशी झाली आहे, व कांहीं इनामदारांबरोबर समरी सेटलमेंट ( चौकशी- शिवाय आपसांत ठराव ) करण्यांत आले आहेत. पहिले तीन वर्गाचे इनामा- बद्दलही चौकशी होऊन किंवा चौकशीशिवाय जुडि वसवून गार्डनसाहे- वांचे रुळींप्रमाणे ठराव झाले आहेत. सिंध प्रांतांत मुंबई इलाख्याप्रमाणेच साऱ्याची पद्धति लागू आहे. जमि- नीचे गुणाप्रमाणे प्रतवारी लावण्यांत येते, व हा प्रदेश निःपर्जन्य असले- मुळे ही प्रतवारी लावतांना पाण्याच्या पुरवठ्याच्या सोईचा विशेष विचार करण्यांत येतो. साधारण सर्व शेतकी सिंधु नदीचे पाण्यावरच चालते. ते पाणी प्रत्यक्ष पुरापासून किंवा पाटांतून शेंदून काढून जमिनीस देण्यात येते व त्यावर शेतकी चालते. या प्रातांत जमीन काही मुदत पड टाकावी लागते, व या- साठी सन १८६३-६४ सालचे साऱ्याचे ठरावाचे वेळी सर्व्हे नंबर मोठा धरून त्यावर हलका सारा बसविण्यात आला होता. त्याचा हेतु असा की कुळास कांहीं जमीन पड टाकण्यास सवड राहावी. परंतु त्या व्यवस्थेस अनुसरून कुळे वागली नाहीत ; ती सर्व जमीन लागवड करीत व ती निकस झाली ह्मणजे सोडून देऊन दुसरी धरति. फेरतपासणर्णाचे वेळी पूर्वीची व्यवस्था पालटली आहे. आतां नंवर लहान करून पूर्ण सारा घेण्यांत येतो, व पड जमिनीवर कुळांचा हक्क मात्र कायम ठेवण्यांत येतो; तिजबद्दल त्यांस सारा पडत नाही. या प्रांतांत सान्याचे ठराव दहा वर्षांचे मुदर्ताचे होतात. मंबई इलाख्यांत जमीन धारण करणारांचे रजिष्टर ठेवण्यांत येते. त्यांत कुळांची नांवें, त्यांचेकडे असलेली जमीन, व तिचा सारा ही दाखल केलेलों असतात. दिगंरवादी झाल्यास रजिष्टरांत दुरस्ती करण्यांत येते.