पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७२) त्याची पूर्वीची तीस वर्षांची जमाबंदीची माहिती काढतात, व सान्याचे प्रमाण कसे होते व तो सोईनें वसूल हो . असे किंवा कसे, हवापाण्याचे मान कसे अस- तें, धान्यास किंमत कशी येते, शेतकी वाढली आहे किंवा कमी झाली आहे, दळणवळणाचे मार्गाची स्थिति कशी आहे, पाटबंधारे झाले आहेत किंवा कसे, जमिनीस किंमत किती येते, मालविक्रीस बाजाराची सोय कशी आहे वगैरे गोष्टींचा विचार करून त्या तालुक्यावर किंवा गांवांचे समुदायावर बसविण्याचे सान्याचा आकार ठरविण्यात येतो. त्या सान्याची नंतर गांववार व नंबरवार वांटणी जमिनींचा आकार व प्रतवारी यांचे मानाने होते. साधारण साऱ्याचा आकार जामनांचे उत्पनाचा पंधरावा अंश असावा असें धरतात. हे ठराव तीस वर्षा- चे मुदतीचे होतात. सारा नियमित रीतीने देण्यात येत आहे तोपर्यंत ती जमीन धारण करणाराक- डून काढण्यात येत नाही. ती त्यास दुसन्यास देतां येते, व खातेदार मयत झोला तर ती त्याचे वारसाकडे जाते. साऱ्याची फेरतपासणी झाल्यावर जो सारा ठरेल तो देण्याची जबाबदारी कुळांवर आहे, सारा देण्याचा नसे. ल तर त्यांस जमीन सोडण्याची परवानगी असते. ही सर्व्हपद्धतीप्रमाणे ज. मीन धारण करण्याची रीत आहे. याशिवाय प्राचीनपैकीही काही जमीन धारण करण्याच्या पद्धति चालू आहेत. गुजराथेंत तालुकदारी, नर्वदारी, भागदारी, व मेहवासी अशा पद्धति आहेत. तालुकदारी ही बंगाल्यांतील जमीनदारी पद्धतीचे नमुन्यावर आहे. तालुकदार हे पूर्वीचे रजपूत ठाकु: रांचे वंशज आहेत, व त्यांची जमिनीवरील मालकी सरकारोंनी कबूल केलेली आहे ; तरी त्यांस जमीन सरकारचे परवानगीशिवाय फरोक्त करून देण्या चा अधिकार नाही ; गहाण टांकता येते. त्यांच्याकडून कमाल आकारापैकी ५०१७० टक्के आकार सरकारांत सारा ह्मणून घेण्यांत येतो. तापीचे उ- त्तरेस काही गांवांत वंत ( जीत वाटणी झालेली आहे अशी ) पद्धति चालू आहे ती मूळची तालुकदारी पद्धतीच आहे, परंतु मुसलमानांचा अंमल बसल्यावर त्यांनी त्या तालुकदारांच्या जमिनीपैकी तीन हिस्से जमीन सरकारांत खालसा करून घेतली व चवथा हिस्सा त्यांस ठेवला असा तीत फरक झाला आहे. असे जमिनीवर सारा माफ असतो, किंवा फक्त काही जुडी मात्र घेण्यांत येते. नर्वदारी व भागदारी ह्या उत्तरहिंदुस्थानांतलेप्रमाणे गांवकांच्या पद्ध- ति आहेत. त्यांत जमीन धारण करणारे आपापले साऱ्याबद्दल जबाबदार असून शिवाय ते सर्वांचे सायावद्दलही समुच्चयाने जबाबदार असतात. या पद्धतीस साम्य पावणारी पद्धति ह्मणजे उत्तरहिंदुस्थानांतील पट्टीदारी ही आहे.