पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७१) सर्व्हेचे कामास प्रथमतः जमिनीचे मोजणीपासून सुरवात होते, व शेतें मो- जल्यावर त्यांच्या हद्दी ठरविण्यात येतात, व त्यांस खुणा घालण्यांत येतात. पहिली सहें झाली त्या वेळी केलेले नकाशांत गांवें व गांवच्या जमिनी मात्र दाखविण्यांत येत असत; जिल्ह्याचा चांगला, बरोबर असा नकाशा होत नसे. आतां फेरमोजणीचे वेळी चांगले वरोवर व पद्धतशीर असे जिल्ह्याचेही नकाशे करण्यांत येऊन, त्यांत देशवर्णनाची महितीही चांगली देण्यात येत आहे. सारा प्रत्येक शेतावर आकारण्यांत येतो, या शेतास सर्व्हनंबर असें ह्मणतात. साधारण दोन बैलांनी जितकी जमीन लागवड करता येते, तितके जमिनीचा साधारणतः एक नंबर करतात, व विशेष मोठा नंबर ह्मणजे त्याच्या दुप्पट ज- मिनीचा करतात. शेताच्या हद्दी बांध व वरोळ्या घालून किंवा दगड रोवून दाखवितात व जमिनी दाखविणारे गांववार नकाशे करण्यांत येतात. मोजणीनंतरचे काम झणजे जमिनींची प्रत लावणे हे होय. ती जमिनीत चांग- ली माती किती खोलीपर्यंत असेल त्याप्रमाणे व इतर गुणाप्रमाणे लावतात. जमि- नींचे मुख्य तीन वर्ग करतात, व त्या प्रत्येकाचे नऊ पोटभेद कल्पितात; जमिनीत दोष कमी जास्त असतील त्या मानाने तिची वर्गवारीत पायरी वर खाली होते. सभोवारचे स्थितीचे कारणांनी ही जमिनीची प्रत वाढते. याप्रमाणे जमि- नीचे नैसर्गिक स्थितीशिवाय इतर गुणांचे कारणाने जमिनीची प्रत वाढवि- ण्याबद्दल पहिल्या जाइंट रुळीत तजवीज नवती ; ती सुधारणा त्या रुळीनंतर आलेले अनुभवाप्रमाणे झाली आहे. या गुणांपैकी उदाहरणार्थ दोन येथे दाखल करितो. नदीचे कांठच्या जामनी ज्यांत पूर येऊन मळी बसते, किंवा ज्यांस त्या नदीचे पाण्यापासून बागाईत करण्यास सवड असते, असे जमि- नींचा, त्यांचे अंतस्थ गुणाने नंबर लागेल त्यापेक्षा, ह्या विशेष प्रकारचे फाय- द्यासाठी जास्त बर लावण्यात येतो. कांही जमिनीत बागाईत करण्यास उपयोगी पडण्यासारखें पाणी लागते, व कांहीस लागत नाहीं; व दोन्ही प्रकारचे जामिनावर सारा सारखा घेतला तर योग्य होणार नाही ह्मणून पाणी लागण्याचा संभव आहे ह्या कारणानही जमिनीची वर्गवारी वाढविण्यांत येते. ह्या गुणांची नांवें "भूम्यंतरगत पाण्याची सोय” व “साधारण फायदेशीर स्थिति " अशी आहेत. भातशेताचे प्रतवारीचे नियम वेगळे आहेत. प्रतबंदी झाल्यावर हवापाणी, बाजारचे सान्निध्य, व शेतकीची स्थिति, या गोष्टींचे अनु- रोधानें गांवचे समुदाय बनविण्यांत येतात. हे समुदाय तालुक्यापेक्षा मोठे असत नाहीत, लहान असतात. साऱ्याचा आकार ठरविण्यासाठी ज्या तालुक्याचा ठराव करण्याचा असेल