पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७० पाऊणपट जमीन जास्त लागवडीस आली आहे व त्याच मुदतीत लोकवस्ती शेकडा ६१ टक्के वाढली आहे व सरकारचे सान्याचे उत्पन्न 3 शानें वाडलें आहे. मद्रासइलाख्यांतील दक्षिण व उत्तरेकडील भागांत एकंदर जमिनी कायम सारा ठरवून देण्यांत आल्या आहेत. रयतवारी पद्धतीत जमाबंदी ही महत्वाची गोष्ट आहे. या प्रांतांत दर साल जमाबंदी होते. सारा जरो तीस वर्षांचे मुदतीचा ठरलेला असतो तरी, जित- की जमीन कुळाने लागवडोस घेतलेली असेल त्यावरच तो द्यावा लागतो व त्या रकमेत ठरीव नियमाप्रमाणे दरसाल काही कमीजास्ती करण्यांत यत. हे सर्व काम जमाबंदीचे वेळी होते. जमाबंदीत पाहेले काम ह्मणजे त्या साली कुळाचे खात्यास किती जमीन होती तें पहाण्याचे आहे ; क्षेत्र समजलें मगजे त्यावरून जमीन धारण करणान्याने देण्याच सारा निश्चित होतो. त्यानंतर बागाईत जमिनांत दुसरे पीक केले असेल तर त्याबद्दल सारा ठरविण्यात येतो व पाटबंधाऱ्याच पाणी घेऊन पीक केले असल्यास त्याबद्दल घेण्याचा आकार ठरविण्यात येतो. जमाबंदीचे वेळचे महत्वाचे काम मगजे प्रसंगाप्रमाणे सूट देणे हे आहे. सरकारी पाटाचे पाणी बरोबर न मिळाल्याने किंवा दुसरे कार- णानें कुळांचे नुकसान झाले असल्यास, त्याबद्दल सारा सूट देण्यात येतो; काही ठिकाणी पूर्वीचे ठरावाप्रमाणे बसलेले सान्याचे दरांत फेरतपासणी झाली नसेल असे भागांत, सूट देण्याबद्दल ठराव आहेत, त्याप्रमाणे ही सूट देण्याची ती याच वेळी देण्यात येते; तसेंच फेरतपासणीत नवीन वाढलेले दर लागू करतांना ते काही दिवस पूर्ण घेण्यात येत नाहीत, त्याबद्दल वजावाट याच वेळी होते. प्रमाणे जमाबंदी झाल्यावर पट्टे देण्यात येतात. मुंबई इलाख्यांतही सायचे ठराव रयतेवरोवर रयतवारी पद्धतीप्रमाणेच होतात. या इलाख्यांत चालू असलेले सारा ठरविण्याचे रीतीस सर्व्हे पद्धाते असें विशेष नांव आहे. पेशवाई जाऊन इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर पाहे- ल्याने प्रिंगलसाहेब यांनी साऱ्याचा आकार ठरविण्यास आरंभ केला, व त्या वेळी जमिनीचे उत्पन्न व खर्च पाहून त्यावरून सारा ठरविण्यांत येत असे ; परंतु जमिनीची मोजगी व उत्पनाचा आकार ही दोन्हीही करण्यांत प्रथमतः चुका झाल्यामळे त्या वेळी सा-याचा दर फारच जरब बसला. या दराप्रमाणे सारा वसूल होत नसे व पुष्कळ कुळांनी जमिनी सोडून दिल्या हात्या. यानंतर गो- ल्डस्मीड व विंगेटसाहेबांनी सारा आकारण्याचे पद्धतीत सुधारणा करून नवीन पद्धति सुरू केली, ती अजून चालू आहे. या-