पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 (१६८) कीचे उत्पन्नाची किंमत वाढली, (३) किंवा सरकारखर्चाने एखादी सुधारणा झाली व त्यामुळे जमिनीचा फायदा झाला, तर जामिनीचा सारा वाढविण्यास हर- कत नाही. कुळांनी आपले खर्चाने सुधारणा केल्यास त्याबद्दल जास्त सारा बसविण्याचा नाही असेंही ठरलें. या प्रांतांत सर्वच जमिनींबद्दल कायमची दरठरोती झालेली नाही. कायम सारा ठरले. जमिनींपैकी काही विशेष कारणांनी सरकारांत आल्या, त्या कुळांस कायमचे ठराव करून न देतां, मुदतीचे कराराने दिलेल्या आहेत : किंवा त्या जामेनी सरकारचे अंमलदारांचे वहिवाटसि ठेवल्या आहेत. हे ठराव साधारण वायव्य प्रांतांतील ठरावांचे धरतीवर झाले आहेत. या प्रांतांत एकंदर जमीन धारण करण्याचे चार प्रकार आहेत. (१) काय. मचे सान्याचे दरठरोतीप्रमाणे. (२) कांहीं मुदतीचे ठरावाप्रमाणे. (३) सर कारचे प्रत्यक्ष वहिवाटीत असलेल्या जमिनी. (४) सरकारचे मालकीच्या जमि- नी रयतवारी पद्धतीप्रमाणे कुळांस लागवडीस दिल्या आहेत त्या. अज्ञान किंवा काही कारणांनी जमीन करण्यास नालायक झालेले जमीनदारां- च्या जमिनीची सरकार कोर्ट आफ वार्ड्स यांचे मार्फत वहिवाट करतें या इष्टे टींचे वहिवाटी साठी वहिवाटदार नेमलेला असतो, तो जमिनीबद्दल योग्य सारा घेउन त्या कुळांस लावणे, त्यांची सुधारणा करणे, व शिल्लक राहिल्यास ती रकम जमिनीचा कायमचा फायदा होईल असे कामांकडे लावणे, ही कामें कर तो; ह्मणजे एकंदरीत चांगला समंजस मालक ज्याप्रमाणे वहिवाट करील तशी करतो. मद्रास-मद्रास इलाख्यांत वऱ्याच जमिनींचा सारा रयतवारी पद्धतीप्रमाने ठरलेला आहे. या पद्धतीप्रमाणे सारा ठरविण्यासाठी पहिल्याने मोजणी करण्यांत येते व तीत गांवच्या व शेतांच्या हद्दी ठरविण्यात येतात. त्यानंतरचे काम ह्मणजे सारा ठरविणे हे होय. तो ठरविण्यासाठी पहिल्याने देशाचे नैसर्गिक अंत र्वाह्य स्वरूप, पर्जन्यवृष्टीचें व अवर्षणाचे मान, तसेंच जमाबंदीचे स्थितीचा पूर्व वृत्तांत्त, मार्गक्रमणाच्या सोई, बाजारचे सान्निध्य व वागाइतास पाण्याचा पुरवठा वगैरे गोष्टींबद्दल चौकशी करतात. हे काम ठराव करणारा अंमलदार स्वतःक रतो. त्यानंतर जमिनीचा प्रकार, त्यांचा सुपीकपणा व नैसर्गिक स्थिति यांचे संबंधाने जमिनींची प्रतबंदी करण्यात येते. पुढे जमिनीत पीक किती येते है वेगळाले शेतांत निमताना घेऊन काढण्यात येते. वीस वर्षांचे बाजारभावाने सरासरीप्रमाणे त्या पिकाची किंमत ठरवितात. हे काम तहशिलदार व इतर मुलकी कामगार यांचे होते. पिकाचे किमतींत खर्चाची रक्कम वजा करून