पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येथे अतिशय संक्षिप्त अशी माहिती मात्र देणे शक्य आहे; त्यांबद्दल पूर्ण विवेचन करण्यास एक स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. जमिनीच्या उत्पन्नाचा काही भाग राजाने घेण्याची वहिवाट फार प्राचीन काळची आहे. राजाने द्वादशांशापासून षष्ठांशापर्यंत, जमिनीचा मगदूर व ती कमाविण्यास मेहनत किती लागत असेल त्या मानानें, पिकाचा अंश ध्यावा, व हा कर अडचणीचे वेळी एकचतुर्थी- शापर्यंत वाढवावा असें मनुस्मृतीत सांगितले आहे. प्राचीन ग्रामव्यवस्थेत जमीन खासगी लोकांचे मालकीची नसून गांवचे समस्त लोकांची, व त्या जमि- नीचे उत्पन्न सर्व गांवचें, असें असे. त्यांतून गांवचा मुख्य, वांटणीचे पूर्वी राज- भाग काढून ठेवी, व राजास त्याबद्दल तोच जबाबदार असे. ही पद्धत मुसल- मानी अंमल सुरू होईपर्यंत होती, व अजनही उत्तरहिंदुस्थानांत काही भागांत चालू आहे. मोंगल बादशहांचे वेळी सारा घेण्याची पद्धत होती ती अकबराचे कारकीर्दीत तोडरमल याणे चालू केलेली होती. या पद्धतीप्रमाणे जमिनीचे उत्पन्नाची, दहा वर्षांचे धान्याचे दराचे सरासरीप्रमाणे किंमत ठरवून, त्यापैकी तिसरा किंवा चवथा हिस्सा सारा ह्मणून सरकारांत घेण्यात येत असे, व सा- प्याचा ठराव दरखेपेस १० वर्षांचे मुदतीचा होत असे. मोगलाई अंमल ज्या ठिकाणी कायम बसला होता तेथें अकवराचीच पद्धत चालू होती; तीच रीति दादोजी कोंडदेव यांचे सल्याने शिवाजी महाराजांचे राज्यांत चालू झाली. हा वसूल ऐनजिनशी होत असे. पुढे पेशवाईत इ. सन १७८८ साली बागाईत उत्तम दरविष्यास ६ रुपये, मळईचे दरबिध्यास रु. ३, व उत्तम काळीच्या दरविव्यास रु. २ व त्याचे खालोखाल जमिनीस सवारुपया, रुपया, बारा आणे असे दर ठरवून नक्त रीत चालू केली. दक्षिणहिंदुस्थानांत जेथे मुसलमा- नांचा अंमल फार दिवसपर्यंत नव्हता तेथें, रयतेकडून उत्पन्नाचा अंश दरसाल पाहणी होऊन ठरलेले दराप्रमाणे घेण्यात येत असे. पूर्वीचे कारकीर्दीत उत्पन्ना- चा कितवा अंश सरकारांत घेण्यात येत असे यासंबंधाने पाहतां असें दिसून येते की, मोंगल उत्पन्नाचा तिसरा किंवा चौथा हिस्सा घेत, मराठे निम्मे घेते, व मद्रासेकडेही तोच दर होता; शिखांचे राज्यांत निम्यापेक्षा काही कमी किंवा निम्मे, व बंगालकडे निम्यावर काही जास्त असा घेण्यात येत असे. बंगाल प्रांतांत जमीनवाव मध्यस्थांचे ह्मणजे जमीनदारांचे मार्फत वसूल करण्यांत येत असे. जमीनदार हे मोगलांचे कारकर्दीितच प्रथमतः उत्पन्न झाले. ते काही भागाचा सारा ठरवून, तो मक्त्याने घेत असत, व कांही प्रसंगी हिंद राजे किंवा बडे लोक हेही त्यांचे अमलांतील मोंगलाई भागांचे संबंधानें मक्ते घेत. याप्रमाणे जमीनदारांत कांहीं फक्त सारा वसूल करणारे अंमलदारच होते व