पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वावी कोणत्या त्याबद्दल पत्रक पूर्वी दिलेच आहे. लष्करी खचाचे बाबती- संबंधाने चालू असलेल्या तकरारीबद्दल पूर्वी माहिती दिलीच आहे. लष्करी खर्चाशिवाय इतर खर्च होत आहे त्यासंबंधाने विशेष सांगण्यासारखे काही नाही. एकंदरीत तो खर्च सढळ हाताने होत आहे अशी तकरार आहे. हिंदुस्था- नासंबंधाने होत असलेला सर्व खर्च त्याच देशाकडून घेण्यांत येतो, तसा इतर वसाहतींचे सरकारांकडून घेण्यांत येत नाहीं; हिंदुस्थानांत येणारे विलायतेचे सैन्याबद्दल सर्व खर्च घेण्यांत येतो तसा त्या वसाहतींकडून घेण्यांत येत नाही; रायल एन्जनियरिंग कालेज हे सर्व हिंदुस्थानचे खर्चाने चालले असून त्यांत विलायतेतील इतर विद्यार्थ्यांस फी घेऊन शिक्षण मिळते व याप्रमाणे हिंदुस्थान- चे पैशाने चाललेले संस्थेचा फायदा, विलायतेचे लोकांस होत आहे; ईलिंग येथील वेड्यांचे इस्पितळाचे खर्चात हिंदुस्थानास नुकसान सोसावे लागते; वि. लायतेंत हिटस्था नासंबंधानें हापिसे फार मोठाली हिंदुस्थानचे खर्चाने बांधली आहेत: स्टेटसेक्रेटराचे कान्सिलांतील मेंबर लोकांस हिंदुस्थानांत केलेले नौकरी- बद्दल पेनशन मिळून शिवाय पगारही मिळतो; ईस्ट इंडिया कंपनी मोडल्यावर जे नोकर लोक मोकळे पडले त्यांची इतर खात्यांत तजवीज न करिता त्यांस पेनशन देण्यात येते; विलायतेस बाग व पदार्थ संग्रहालये हिंदुस्थानचे खर्चाने विलायत लोकांचे गमतीसाठी ठेवलेली आहेत वगैरे. खचात काटकसर होण्यास काय उपाय योजिले पाहिजेत याबद्दल १८९४ सालचे प्रांतिक सभेचे बैठकांचे वेळी अध्यक्षांनी जे भाषण केले त्याचा सारांश एका संमाननाय वर्तमानपत्रावरून येथे देतो. त्यांत जे उपाय सुचविले आहेत ते फार विच र करण्यासारखे आहेत. हिंदुस्थानचा खर्च हलीं जो वेसुमार वाढू लागला आहे, खजिन्याची विल- क्षण वेधा उडून गेली असून इंग्रज व युरोजियन कामगारांच्या हुंडणावळीची मरपाई करण्याकरितां, ते कामावर केव्हां लागले याचा विचार न करता व त्यांस इंग्लंडांत खरोखर पैसे पाठवावे लागतात की कसे याचीही चौकशी न करतां, हिंदुस्थानच्या प्रजेवर आणखी एका काटीचे जे ओझें नवीनच लादण्यांत आले आहे, त्याला आळा पडून काटकसर होऊं लागण्यास काय उपाय योजावे- त हे शोधून काढणे या घटकेस फारच अगत्याचे होऊन गेले आहे. मला यासं- बेधाने तीन उपाय सुचतात. १ ला उपाय ब्रिटिश सरकाराने हिंदुस्थानच्या क- जर्जाची हमी घ्यावी; रा उपाय मुख्य व प्रांतिक कौन्सिलांतील सभासदांस बजेटावर मत दण्याचा अधिकार देण्यात यावा; व ३ रा उपाय हिंदुस्थान हल्ली- प्रमाणे 'डिपेन्डन्सी' न मानतां 'काऊनकॉलनी' प्रमाणे लेखण्यांत यावा. स