पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५७ ) मिनिटांत लाई साहेबांनी असे लिहिले आहे की, “ नवीन कर नुकताच बसवि- ण्यांत आला त्याचे मुख्य कारण ह्मणजे दुष्काळापासून जे हाल होतात त्यांचे निवारण करावे, व हाल न होतील अशी तजवीज योजावी हे होते, व ह्या हेतूमुळेच हा कर बसविणे न्याय्य होते. या कामासाठी दरसाल दीड कोटि रुपये देण्यात येतील असें पूर्वी वचन दिलेच आहे, व लोकांस असेंही सांगण्यांत आले आहे की, त्या कराचे पैसे सरकारास राज्याचे चैनीचे खर्चासाठी किंवा नित्य खर्चासाठी नको आहेत, दुष्काळाचे निवारण करण्यास उपयोगी होतील, अशी पब्लिक वर्क्सची कामे करण्यासाठी हे पेसे पाहिजे आहेत, व याप्रमाणे वसूल केलेले पैशांपैकी एक रुपयाही दुसरे कामाकडे खर्च केला जाणार नाही." गेले सोन वर्षांत या कारणासाठा वसूल कलेले पैशांपैकी सहा वर्षे रकम दुसरे कामाकडे घेण्यात आली, व दोन साली ठरलेले रकमेपैकी एकतृतीयांश रकम खर्च झाली; ह्मणज किरकोळ गोष्टी सोडून दिल्या तरी एकंदर सोळा वर्षी- त ठरलेले रकमेपैकी एकतृतीयांश रकम कमी खर्च करण्यांत आली, असें लोक- पक्षाचे ह्मणणे आहे. सन १८९४ साली जमाखर्चाचे अंदाजाचा विचार लेजिस्- लेटिव्ह कोन्सिलांत झाल्या वेळी यासंबंधाने सरकारांनी आपले विचार प्रकट केले. त्यांतील महत्वाचे मुद्दे असे आहेत की (१) सर जॉन स्ट्रॉची यांनी दुष्काळ- फड सुरू करते वेळी असे सांगितले होते की, ती रकम दुष्काळापासून संरक्षण होण्यासाठी जरूर तितकों सर्व कामें झाली, असें अनुभवाने दिसून येईपर्यंत देण्यांत येईल. (२) फ्यामिनकमिशननें वीस हजार मैल आगगाडी झाली ह्मणजे दुष्काळापासून बचाव होण्यास व अन्नाचा पुरवठा होण्यास पुरे हाईल, असे सांगितले होते; व कोणते भागांतून आगगाड्या जास्त जरूरीने झाल्या पाहिजेत, त्या सुचविल्या होत्या; त्याप्रमाणे बहुतेक काम पुरे झाले आहे. अली- कडे जे लहान लहान दुष्काळ पडले, व त्या वेळी जी स्थिति झाली, व जे उपाय योजावे लागले त्यांवरून पहातां आतां सन १८७७ सालचे दुष्काळाप्र- माणे प्रसंग येणारच नाही असे वाटते. ३) पूर्वीच्या इतका यापुढें खर्च करण्याचे कारण नाही. शिलक असेल त्या साली या कामावर खर्च साधेल तितका जास्त करण्यात यावा. (४) गेले तेग वर्षांत या कामावर पंधरा कोटि साठ लक्ष रुपये खर्च कर- ण्यांत आला. त्याचा तपशील- दुष्काळपिडितांस मदत रुपये २९४०००० दष्काळापासून संरक्षणार्थ आगगाड्या ५४८३००००