पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.

गाड्या, दुष्काळनिवारण, पाटबंधारे इ० इ० यांचा खर्च चार कोटि पासष्ट लक्षांनी कमी झाला आहे. एकंदरीत जमेच्या वावीपासून होणारे जास्त उत्पन्न व इतर खर्चाच्या बाबतीत होणारा कमी खर्च यापासूने जो फायदा झाला आहे तो सर्व सिव्हिल व मिलिटरी खर्चाचे वाढीचे भरीस जाऊन शिवाय ९७ लक्ष रुपयांची तूट शिलक रहाते. यावरून असे होते की, हलींच्या तुटीस कारण सिव्हिल व मिलिटरी खर्चात वाढ हेच आहे. माजी फायनॅन्स मिनिस्टर सर डेव्हिड बार्वर यांनी गेल्या मे महिन्यांत एका प्रसंगी असें वोलून दाखविले की, 'हिंदुस्थानच्या तिजोरीची नेधा उड़- ण्याची खरी कारणे शोधली असतां ती पुढे दिल्याप्रमाणे आहेत असे दिसून येईल. १ पाश्चात्य धर्तीवरच सारी राज्यव्यवस्था चालविल्यामुळे होणारा अनावर खर्च ; २ लोकांची संख्या आधीच मोठी व तीही दरिद्री ; ३ कर वसविण्याची बहुतेक होऊन गेलेली परमावधी ; ४ उत्पन्नाची वाढ थोडी आणि त्यावर मागण्या वेसुमार ; ५ उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करण्याकडे नेहमी असलेली प्रवृत्ति ; ६ हिंदुस्थानची राज्य पद्धतीच अशी आहे की खर्च वाढा- वयाचा झाला की, त्यास सर्व अनुकूल, पण काटकसरीचें नांव विघालें की जो तो उलट ; ७ जमाखर्चावर इंग्लंडच्या किंवा हिंदुस्थानच्या लोकमताच्या दावा- चा अभाव; ८ उत्पन्नाची नेहमी होणारी चलबिचल ; ९ आधीच डोईजड झाला असून एकसारखा वाढत जाणारा येथून इंग्लंडास करावा लागणारा पैशा- चा भरणा.' अक्टोबरच्या नाइन्टीन्थ सेंचरीमध्ये सर ऑकलंड कालव्हिन यांनी ही वरच्याप्रमाणेच आपले मत प्रदर्शित केले आहे. जमेच्या बाबींचे संबंधानें वर्णन स्वतंत्र भागांत आहे. तेव्हां त्यांचे संबंधाने ज्या तकरारी आहेत त्या त्या त्या वर्णनाचे पुढे देण्यांत येतील. खर्चाचे बाबीं- पैकी ज्यांचे संबंधाने इतर ठिकाणी वर्णन नाही अशा काही बाबी आहेत त्यां- संबंधाने मात्र या भागांत पढें सांगण्यात येत आहे. ३. दुष्काळनिवारणार्थ फंड-हा फंड काय कारणासाठी व काय हेतु धरून काढला तें वर सांगितलेच आहे. सरकारास पैशाची टंचाई झाली ह्मणजे दुष्काळ- निवारणार्थ कामांवर खर्च करण्याचा पैसा सरकार दुसरे कामांकडे लावतात, हा तकरारीचा मुख्य मतलब आहे. या पक्षाचे ह्मणणे असें आहे की, हा फंड करण्याचे ठरविले त्या वेळी त्याच कामांसाठी ह्मणून नवीन कर बसविण्यांत आले होते व त्यांचे उत्पन्न याच कामांप्रीत्यर्थ खर्च होईल असें सरकारांनी वचन दिले होते. या तकरारीचे पुष्टीकरणार्थ १२ मार्च १८७८ रोजी लार्ड लिटन यांनी मिनिट लिहिले आहे त्याचा आधार दाखविण्यात येतो. त्या