पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५५) प्राप्तीवरील कर-दुप्पट केला तरी हल्लींचेपेक्षा रु. १५०००००० जास्त उत्पन्न होतील. समजूतदार लोकांत त्यामुळे असंतोष उत्पन्न होईल ब रुप्याचा भाव उतरल्यामुळे ज्या लोकांचे नुकसान होत आहे त्याच लोकांचे यांत जास्त नुकसान होईल. नवीन कर.-ज्या वस्तूंवर कर बसवून काही रक्कम येण्यासारखी आहे त्या तंबाखु व साखर या आहेत. हे पदार्थ हिंदुस्थानांत ठिकठिकाणी थोडे थोडे करण्यांत यतात, तेव्हां तो कर वसूल करण्यांत लोकांस त्रास फार होईल व त्यास खर्चही फार लागेल. वारसा प्राप्त झाला असता त्या इष्टेटीवर कर घेण्यास हिंदुस्थानां- तील वारसाचे कायद्याची पद्धति फार तन्हेवाईक आहे यामुळे अडचण व त्या- पासून बरीचशी रक्कम वसूल हाईल किंवा कसे यासंबंधाने शंकाच आहे. एकंदरीत विचार पाहतां ज्या लोकांवर योग्य रीतीने कर बसवितां येईल तशा लोकांवर कर बसवून व कराचे बाबतींतील तत्वांस अनुसरून कर वसवून प्याचे किमतीत तफावत झाल्यामुळे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्या- इतकी रक्कम वसूल होईल असे मानण्यास अडचणी आहेत." २. हिंदुस्थानचा खर्च वाढत चालला आहे व तो उत्पन्नाचे वाढीचे प्रमाणा- पेक्षा जास्त प्रमाणाने वाढत आहे, यामुळे खर्चात तूट येत आहे. खर्चात वाढीच्या बाबी दोन आहेत, सिव्हिल व लष्कर खर्चाची वाढ व हुंडणावळीचे खर्चात वाढ. चालू सालचे वजेटाचे वेळेस नामदार सर वेस्टलंड साहेबांनी जमाख- र्चाची असमाधानकारक स्थिति होण्यास हुंडणावळीचा खर्च हे एकच कारण आहे असे सांगितलें ; परंतु कांग्रेसकमिटीने यासंबंधानें पार्लमेंटचे सभासदांस एक पत्र लिहिले त्यांत यांनी असे दाखविले की (१) जमेच्या मुख्य ११ वावीपासून होणारे उत्पन्नांत जी गेले १० वर्षांत वाढ झाली आहे, त्यांतून हुंडणावळीबद्दल जी जास्त रक्कम लागत आहे भागून, तितकीच रकम आणखी शिलक राहते. यावरून असे होते की, हुंडणावळीबद्दल जास्त खर्च वाढल्यानेच हिशेबांत तूट आलेली नाही किंवा तसे होण्यास तें महत्वाचे कारण आहे असेंही ह्मणतां येत नाही. (२) त्या दहा वर्षांचे मुदतीत सिव्हिल व लष्करी खर्चाची वाढ जवळ जवळ नऊ कोटि रुपये झाली आहे ; व तो हुंडणा- वळी सुद्धा एकंदर वारा कोोटे सतरा लक्ष रुपयांवर वाढला आहे. या खात्यां- शिवाय इतर ज्या खर्चाच्या बाबती ह्मणजे पोष्ट व दुसरी खाती, व्याज, आग- ..